आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टूल्सचा वापर केल्याने जास्त प्रॉडक्टिव्ह होतील तुमचे ई मेल्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिकांसाठी ई मेलचे खूप महत्त्व आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आपल्या इनबॉक्सचे व्यवस्थापन करणे, मेल्सचा प्राधान्यक्रम ठरवणे, त्यांचा मागोवा घेणे, एक मोठ्या मेलिंग लिस्टपासून स्वत:ला अनसब्सक्राइब करणे इत्यादी त्यांच्या कामांचा मोठा भाग आहे. ई मेल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त टूल्स उपलब्ध आहेत ज्यांच्यामुळे काम साेपे झाले आहे.

अॅक्टिव्ह इनबॉक्स
हे जीमेलसाठी एक अॅड- ऑन आहे, जे मेल्सना टास्कमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देते. एखाद्या प्रॉपर्टी ब्रोकरने तुम्हाला ई मेल पाठवून उद्या कोणती प्रॉपर्टीज पाहायची आहे, अशी विचारणा केली. मात्र, तुम्हाला हे काम आजच करायचे असेल तर तुम्हाला लगेच उत्तर द्यावे लागणार नाही.

क्रिस्टल (फ्री ट्रायल)
हे तुम्हाला त्या व्यक्तीबाबत सांगेल ज्याला ई मेल करायचा आहे. क्रिस्टल तुमच्या ई मेल रिसीपिएंटबाबत जाणून घेतल्यानंतर त्याला आवडणाऱ्या वाक्यांचा उपयोग करण्याचा सल्ला देईल. हे नवीन क्लाएंट्स आणि कलिग्जदरम्यान संबंध स्थापन करण्यात मदत करेल.

अॅडिसन मेल
मोबाइल डिव्हाइसमध्ये पुन्हा पुन्हा ई मेल मॅनेज करणाऱ्यासाठी अॅडिसन मेल नावाचे मोफत मोबाइल ई मेल क्लायंट अॅप (अँड्रॉइड, आयओएस) उपयुक्त आहे. ते यात कोणतेही ई मेल खाते जोडून त्यात अनेक खातीही जोडू शकता. याचे फोकस्ड इनबॉक्स व्ह्यू, प्रोमिनेंट अनसब्सक्राइब बटण आणि मॅसेजला आपोआप वर्गवारी (जैसे ट्रव्हल, पॅकेजेस व बिल्स अँड रिसीट्स) करणारी काही खास फिचर्स आहेत.

ईएम क्लायंट (केवळ विंडोजसाठी)
या ईमेल क्लायंटमध्ये स्नूज बटण असते जे जीमेलमध्ये नसते. जे वापरकर्तेत वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद करतात, मात्र त्यात ते पारंगत नाहीत त्यांच्यासाठी ईएम क्लायंट उपयुक्त राहील. यामध्ये भाषांतराचे फिचर्सही उपलब्ध आहे. एकाच इंटरफेसमध्ये ईमेल, कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स आणि टास्क टाकता येतील. याची किंमत (सुमारे ५० डॉलर) थोडी जास्त आहे. मात्र, वेळोवेळी खर्च करण्याऐवजी एकदाच केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते.

बातम्या आणखी आहेत...