आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Usman Khan Planned To Carry Out Terrorist Attacks In Kashmir After The London Bridge Attack

लंडन ब्रिज हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्याची उस्मान खान याची होती योजना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनच्या एका ब्रिजवर चाकूने हल्ला करणारा दहशतवादी उस्मान खान याला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांनी, 'तो जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा कटही रचत होता, ब्रिटनमध्ये दहशतवाद्यांची नवी पिढी तयार करून तेथे दहशतवाद पसरवण्याची त्याची इच्छा होता', असा इशारा दिला होता.

१९९० मध्ये लंडन स्टाॅक एक्स्चेंजमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या प्रकरणात उस्मान खानला २०१२ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. ब्रिटिश न्यायाधीश अॅलन विल्की यांनी आपल्या निकालात म्हटले होते की, खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काश्मीरमध्ये एका मशिदीला लागून असलेल्या जागेत दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्याची भयानक योजना तयार केली होती. न्यायाधीश विल्की म्हणाले की, 'जेव्हा मी २०१२ मध्ये खानला शिक्षा सुनावली होती तेव्हा तो स्वत:ला इतरांपेक्षा जास्त जिहादी मानत होता.'

उस्मान खान याने शुक्रवारी लंडन ब्रिजवर चाकूने हल्ला करून एका महिलेसह दोघांची हत्या केली होती, तर तिघांना जखमी केले होते. नंतर पोलिसांनी त्याला गोळी मारली होती. ब्रिटनमध्ये जन्मलेला आणि तेथीलच नागरिक असलेला उस्मान खान याने बालपणातील काही वर्षे पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये व्यतीत केले होते. लंडन स्टाॅक एक्सचेंजमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या प्रकरणात त्याला आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पॅरोलवर सुटला होता आणि निगराणीत होता. तो अल-कायदाच्या अरेबियात सक्रिय दहशतवादीअसलेल्या अन्वर अल-अवलाकी याने इंटरनेटवर पसरवलेल्या दुष्प्रचाराने प्रभावित होता.

लंडन ब्रिज काही दिवस बंद राहणार

लंडनमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यानंतर न्यायवैद्यक शास्त्र विभागाच्या चौकशीमुळे काही दिवसांसाठी लंडन ब्रिज बंद ठेवण्यात येईल. शहराचे महापौर सादिक खान यांनी ही माहिती दिली. सादिक यांनी लंडन ब्रिजचा दौरा केल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, लंडन ब्रिज काही काळासाठी बंद राहील. लंडन परिवहन सेवेने म्हटले आहे की, हल्ल्यामुळे ब्रिजवरील दोन्ही बाजूंची वाहतूक रोखण्यात आली आहे.

लंडन हल्ल्याची जबाबदारी आयएसने स्वीकारली

इस्लामिक स्टेट (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने लंडनवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्याच एका सदस्याने हा हल्ला घडवून आणला, असे या संघटनेने म्हटले आहे. इस्लामिक स्टेटने अमाक या आपल्या वृत्तसंस्थेत एक पोस्ट जारी करत ही घटना घडवून आणल्याचा दावा केला आहे. ही पोस्ट टेलिग्राम अॅपनेही प्रकाशित केली आहे. इस्लामिक स्टेटने म्हटले आहे की, उस्मान खान याने शुक्रवारी आमच्या संघटनेतर्फे चाकू हल्ला केला होता. 'लंडन इव्हिनिंग स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलाही पुरावा दिलेला नाही.
 

बातम्या आणखी आहेत...