आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे उत्कर्ष शिंदेच्या सुपरहिट गाण्यामागचे गुपित? आदर्श शिंदेने सांगितले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः कलर्स मराठीवरील ‘दोन स्पेशल’च्या मंचावर या आठवड्यामध्ये लोककलेची पिढीजात परंपरा यशस्वीरित्या सांभाळणारे आजचे आघाडीचे, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे येणार आहेत. हे दोघं एकत्र येणार म्हणजे गाणी सादर होणारच. या कार्यक्रमात आदर्शने ‘देवा तुझ्या गाभार्‍याला’ हे गाणे सादर केले आहे. तर उत्कर्षनेही काही गाणी सादर केली. गाण्यांसोबतच ‘दोन स्पेशल’च्या मंचावर बालपणीच्या आठवणींचीही मैफल जमली.

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जितेंद्र जोशीने विचारले, “तुमच्या दोघांपैकी आनंद शिंदे यांचा लाडका कोण?” यावर आदर्शने लागलीच उत्तर दिले की, “उत्कर्ष जास्त लाडका आहे.” यामागचं कारणही त्याने सांगितलं. दोन भावांनी एकमेकांबद्दलच्या अशा अनेक मजेशीर आठवणी, किस्से या एपिसोडमध्ये सांगितले आहेत.

कार्यक्रमात जितेंद्रने जेव्हा उत्कर्षला आई-वडिलांचा एक फोटो दाखवला, त्यावर उत्कर्ष म्हणाला, “माझ्या आईचं हास्य दिलखुलास आहे. तिचं वडिलांवर खूप प्रेम आहे. ती आजसुद्धा माझ्या वडिलांना हाताने जेवण भरवते.” यावेळी आदर्शने उत्कर्षची गाणी सुपरहिट का होतात, यामागचे रहस्यसुद्धा सांगितले आहे.

उत्कर्षला त्याची बहुतेक गाणी बाथरुममध्ये सुचतात याचे काय रहस्य आहे, असा प्रश्न जितूने विचारला असता, आदर्श सांगितले की, त्याने बाथरुममध्ये लिहिलेली सगळी गाणी सुपरहिट आहेत. गप्पांदरम्यान या दोघांमध्ये प्रश्नोत्तरांचा खेळसुद्धा रंगला. कधी ब्रेकअप झालं आहे का, असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला. त्यावर हे दोघं काय म्हणाले हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.