आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh 10 Dead In Kushinagar 3 Saharanpur Due To Poisonous Liquor Consumption

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विषारी मद्य सेवन केल्याने उत्तरप्रदेशात 15 तर उत्तराखंडमध्ये 12 जणांचा मृत्यू, 22 सरकारी कर्मचारी निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी मद्य सेवन केल्याने 27 जण दगावले आहेत. कुशीनगरमध्ये 10, सहारनपूरमध्ये 5 आणि रुडकीमध्ये 12 जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने शुक्रवारी पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागातील 22 कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

 

स्प्रिरिटमिश्रित होती मद्य, राजकीय नेत्यांचे संरक्षण
उत्तरप्रदेशातील जवही दयाल चैनपट्टीमध्ये मंगळवारी (ता.12) रात्री विषारी मद्य सेवक केल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. तिघांनी गावाबाहेरील वीटभट्टीवर पाडण्यात आलेली अवैध हातभट्टी सेवन केली होती. तरम्यान 72 तासांत विषारी मद्य सेवन केल्याने सात जणांवर मृत्यू ओढवला आहे. गावात मृत्यूचा तांडव सुरु झाल्याने श्मशान शांतता पसरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अनिल कुमार सिंह आणि एसपी राजीव नारायण मिश्रा यांनी गावकर्‍यांची भेट घेतली. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

 

दुसरीकडे, स्थानिक लोकांनी पोलिस आणि राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिस आणि नेते मंडळी स्पिरिटमिश्रित अवैध हातभट्टी बनविणार्‍यांना संरक्षण देत आहेत. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागातील 22 कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार शुक्रवारी विभागीय उत्पानन निरीक्षक एचएन पांडेय आणि शिपाई प्रल्हाद सिंह, राजेश तिवारी, रवींद्र कुमार आणि ब्रह्मानंद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाणे अमंलदार विनय कुमार पाठक, प्रभारी भीखू राय आणि कमलेश यादव आणि अनिल कुमार या दोन पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्‍यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...