• Home
  • National
  • Uttar Pradesh : Bus and truck collision on Agra Lucknow Expressway; 13 people feared dead, many injured

उत्तर प्रदेश / आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकरवर धडकली बस; 13 जण ठार, 18 जखमी

फिरोजाबाद जवळ रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली घटना 
 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 13,2020 10:25:00 AM IST

फिरोजाबाद - उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री खासगी स्लीपर बस आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात 13 लोकांचा मृत्यू झाला तर 18 लोक गंभीर जखमी झाले. स्लीपर बस दिल्लीहून बिहारकडे जात होती. यामध्ये 40-45 प्रवासी होते.

बसने पाठीमागून दिली धडक


एसएसपी सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, सदरील बस दिल्लीहून मोतिहारी(बिहार)कडे जात होती. दरम्यान बसने रात्री 10 वाजता फिरोजाबाद येथे रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. जखमींना सैफईच्या पीजीआयमध्ये दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वा दीपक यांच्या मते, अपघातानंतर 31 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 13 जणांचा मृत्यू झाला, सध्या 18 जणांवर उपचार सुरु आहेत.

X