आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे लोक सीएए, एनआरसीमध्ये व्यस्त असताना तिकडे योगींनी आता एका नदीचे नाव बदलले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शहर आणि ठिकाणांची नावे बदलण्यावरून खूप चर्चेत आले होते. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे मीम्स तयार करून व्हायरल केले होते. योगींनी अलाहाबादचे नाव प्रयागराज, मुगलसराय स्टेशन जवळच्या फराह टाऊनला पंडित दीन दयाल उपाध्याय असे केले. त्यातच योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी आणखी एका नामांतराला हिरवा कंदिल दिला आहे. उत्तर प्रदेशातील घाघरा नदी आता सर्वत्र सरयू नदी म्हणून ओळखली जाणार आहे. आता याला केवळ केंद्र सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे.

उत्तर प्रदेशात पोलिस कमिश्नर पद्धत लागू करतानाच सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नदीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सरयू नदीला यापूर्वी वेग-वेगळ्या नावांनी ओळखले जात होते. नेपाळ ते बहराइचला येणारी ही नदी स्थानिकांमध्ये घाघरा नदी म्हणून प्रसिद्ध होती. आता या नदीचे अधिकृत नाव सरयू असे करण्यात आले आहे. नेपाळच्या डोंगराळ भागांतून बहराइच, सीतापूर, गोंडा, बाराबंकी, अयोध्या, आंबेडकर नगर, मऊ, बस्ती, लखीमूर खिरी आणि बलिया असा या नदीचा मार्ग आहे. ही नदी गंगेची सर्वात मोठी सहाय्यक नदी मानली जाते.

बातम्या आणखी आहेत...