आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh : Complaint Filed Against Sonia Priyanka Owaisi For Giving Provocative Speeches Against Amended Citizenship Act

नागरिकत्व कायद्याविरुद्ध भडकावू भाषणे केल्याप्रकरणी सोनिया, प्रियंका, ओवैसींविरोधात खटला दाखल

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

अलिगड (उत्तर प्रदेश) - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भडकावू भाषणे केल्याबद्दल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधीं, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पत्रकार रविश कुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. अॅड. प्रदीप गुप्ता यांनी अलिगड न्यायालयात हा खटला दाखल केला. न्यायालयाने खटला स्विकारली असून यावर 24 जानेवारी 2020 रोजी सुनावणी होणार आहे. 4 डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मंजुरी मिळाली. यामुळे 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, शिख, जैन, ख्रिश्चन, पारशी आणि बौद्ध लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. विरोधी पक्षातील नेते आणि काही पत्रकारांनी या कायद्याबाबत भडकावू भाषणे केली होती. 

बातम्या आणखी आहेत...