Home | National | Other State | Uttar Pradesh Etawah news, burning bike , Shocking video viral

गाडीच्या टायरमध्ये आग लागलेली माहित नसल्यामुळे 4 किलोमीटरपर्यंत चालवली गाडी, मागे बसले होते पत्नी आणि मुलगा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 02:18 PM IST

इटावामध्ये एक्सप्रेस वेवर घडली घटना, पोलिसांमुळे वाचले त्यांचे प्राण

  • Uttar Pradesh Etawah news, burning bike , Shocking video viral

    इटावा(उत्तर प्रदेश)- हा धक्कादायक व्हिडिओ इटावामधल्या एक्सप्रेस वे हायवेवरचा आहे. गाडीत आग लागेलेली माहित नसल्यामुळे तो तशीच गाडी चालवू लागला. गाडीवर त्याच्या मागे पत्नी आणि लहान मुलगादेखील होते. पण उत्तरप्रदेशच्या पोलिसांमुळे त्यांच्या प्राण वाचले. पोलिसांनी त्यांचया पाठलाग करून गाडी थांबवली आणि आग विझवली.


    - मागे लटकत असलेल्या बॅगला सायलेंसरचे घर्षण होऊन आग लागली. अशा घटना फार क्वचितच पाहायला मिळतात, पण पॉलीथीनच्या बॅगशी घर्षण होऊन आग लागली आणि त्यानंतर बॅगमध्यल्या कपड्यांनी आग पकडली.

    - पोलिसांना जेव्हा ही आग दिसली तेव्हा त्यांनी पाठलाग करून त्याला ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला. पण युवकाला त्यांचा आवाज आला नाही, त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबवली.
    - चार किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी युवकाला थांबवले.

Trending