आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मऊ(उत्तरप्रदेश)- मऊमध्ये आज(सोमवार) सकाळी झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्पोठात दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अनेकजण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासन आणि एनडीआरएफची टीमचे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. या स्पोटाच्या तपासासाठी एटीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट सकाळी 7 वाजता झाला. मऊमधील मोहम्मदाबाद परिसरात छोटू विश्वकर्मा यांच्या घरातील गॅस सिलेंडरला आग लागल्याने भीषण स्पोट झाला. हा स्पोट इतका भीषण होता की, शेजारील दोन घरेही पूर्णपणे कोसळली. राज्याचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी(होम) अवनीश अवस्थी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेवर दुखः व्यक्त केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.