आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Congress Road Show: लखनौत प्रियांका-राहुल यांचा रोड शो; 4 तासांत केला 14 किमींचा प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांचा लखनौमध्ये रोड शो केला. काँग्रेसकडून सक्रीय राजकारणात उतरल्यानंतर प्रियांका यांचा हा पहिलाच उत्तर प्रदेश दौरा आहे. त्यांनी सोमवारी विमानतळावर उतरताच रोड शोला सुरुवात केली. या दरम्यान त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया सुद्धा होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, 50 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा गांधी कुटुंबातील सदस्य पक्षाच्या मुख्यालयात 4 दिवस राहणार आहे. यापूर्वी 70 च्या दशकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी नेहमीच पक्ष मुख्यालयात दिवस घालवत होते. त्यावेळी ते ला-प्लास कॉलोनीत राहत होते.

 

राहुल यांच्या भाषणात लागल्या 'चौकिदार चोर है' च्या घोषणा
- पहिल्या दिवशी काँग्रेस मुख्यालयापर्यंत 14 किमीचा रोड शो करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर वेळीच राहुल गांधींनी सभेला संबोधित केले. भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राहुल गांधी चक्क पीएम नरेंद्र मोदींची नक्कल करताना दिसून आले. तेव्हा समर्थकांमधून 'चौकिदार चोर है' च्या घोषणा सुद्धा ऐकायला मिळाल्या.
- काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर 5.15 वाजता राजीव गांधी सभागाराचे लोकार्पण केले. प्रियांका 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत लोकसभावार काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतील. प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी त्या एक-एक तास वेळ देणार असे सांगितले जात आहे. पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका रोज 13 तास बैठका घेणार आहेत. या दरम्यान त्या 42 लोकसभा जागांचे समीक्षण करतील. या दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, प्रमोद तिवारी आणि राज्यसभा खासदार राजीव शुक्ला सुद्धा उपस्थिती नोंदवतील.

 

पक्ष कार्यालयाचा कायापालट
मॉल अॅव्हेन्यू येथे असलेल्या पक्ष कार्यालयाचे 4 महिन्यांतच कायाकल्प करण्यात आले आहे. लायटिंग आणि बसण्याच्या क्षमतेसह सर्वच गोष्टींमध्ये सुधारणा करण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर मीडिया सेंटरची क्षमता 300 वरून चक्क 1000 करण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांना बसण्यासाठी कॉन्फ्रेंस रूम तयार करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...