आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सितापूर - उत्तर प्रदेशच्या सितापूरमधील एका कार्पेट फॅक्टरीत आज (गुरुवार) सकाळी 7 लोकांचे मृतदेह आढळून आले. मृतांमधील 5 जण एकाच कुटुंबातील आहे. माहितीनुसार, फॅक्टरीत कार्पेटला रंगवण्यासाठी केमिकलचा उपयोग केला जात होता. त्यातूनच बुधवारी रात्री गॅस गळती झाली आणि या लोकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या कारख्यानाच्या जवळच एक केमिलक फॅक्ट्री आहे. घटनेनंतर शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून आसपासचा परिसर रिकामा केला.
पोलिसांनुसार, ही फॅक्ट्री इजहारुल नावाच्या व्यक्तीची आहे. घटनास्थळी बचाव कार्य करताना अडचणी येत आहेत. आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या टीम तपासासाठी आत गेले आहेत. गॅसमुळे फॅक्टरीच्या आजूबाजूला 5 कुत्र्यांसह जनावरांचा मृत्यूही झाला आहे. परिसरात दुर्गंध परसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मृतांमध्ये पाच जण एकाच कुटुंबातील
कानपूर येथील अतीक (50) फॅक्टरीत सुरक्षारक्षकाची नोकरी करत होता. तो आपल्या परिवारासह येथेच राहत होता. या दुर्गघटनेत अतीकसह पत्नी सायरा (40), मुलगी आयशा (12), मुलगा अफरोज (8), फैजल (18 महिने) यांचा मृत्यू झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.