आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाविरुद्ध केली बदली, पोलिसाने 60 किमी धावून ठाण्यात पोहोचण्याचे ठरवले, पण 40 किमीवर बेशुद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटावा - उत्तर प्रदेशच्या इटावा येथे बदलीमुळे नाराज झालेले पोलिस अधिकारी विजय प्रताप यांनी बदली झालेल्या पोलिस ठाण्यापर्यंत धावत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु ४० किमी धावल्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिस अधिकारी विजय प्रताप पोलिस लाइनमध्ये तैनात होते. शुक्रवारी बिठोली पोलिस ठाण्यात त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची बदली करण्यात आली. यानंतर त्यांनी बदलीच्या निषेधार्थ पोलिस ठाण्यात धावत जाण्याचे ठरवले. त्यांना रस्त्यावर पळताना पाहून पोलिस गुन्हेगाराच्या मागे धावत असल्याचे लोकांना वाटत होते. परंतु लोकांनी विचारले असता तेव्हा ते म्हणाले, हा त्यांचा निषेध करण्याचा एक मार्ग आहे. विजय प्रताप म्हणाले- 'मी यापूर्वीही बिठोली पोलिस ठाण्यात कार्यरत होतो. तेथील प्रभारीशी वाद झाल्यानंतर, मला पोलिस लाइनमध्ये पाठवण्यात आले.माझ्या इच्छेविरुद्ध माझी तिथेच बदली केल्यामुळे मी या मार्गाने निषेध केला आहे, असे विजय प्रताप यांनी नंतर सांगितले.

बातम्या आणखी आहेत...