आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand BJP Suspended MLA Pranav Singh Champion Brandishing Arms In Liquor Party

ममता कुलकर्णीच्या गाण्यावर हातात रिव्हॉल्वर अन् रायफल घेऊन असा थिरकला भाजपचा निलंबित आमदार, व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडचे भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांनी एका दारू पार्टीत हातात रिव्हॉलव्ह आणि रायफर घेऊन डान्स केला. आपल्या पायाचे ऑपरेशन यशस्वी झाल्याच्या आनंदात त्यांनी आपल्या समर्थकांना पार्टी दिली होती. या दरम्यान ते दोन रिव्हॉल्वर आणि एक रायफल घेऊन डान्स करत होते. 

 

प्रणव सिंह उत्तराखंडच्या खानपूर मतदारसंघातली आमदार आहेत. एक पत्रकाराला धमकी देण्याच्या आरोपात पक्षाने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. दरम्यान आमदाराकडे असलेल्या बंदुकींचा परवाना आहे की नाही याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


पक्ष करू शकतो कठोर कारवाई
पार्टीत आमदाराने हातात बंदुका धरून डान्स केल्यानंतर समर्थकांनी त्यांची वाहवा केली आहे. उत्तराखंडमध्ये असे कोणीच करू शकत नाही, फक्त तुम्हीच करू शकता अशाप्रकारची वाहवा समर्थकांनी केली. यावर उत्तराखंडातच नाही तर देशात असे कोणी करू शकणार नसल्याचे आमदार म्हणाले. सुत्रांच्या मते आमदाराच्या या वागणुकीबाबत भाजप मोठी कारवाई करू शकते.