आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे उत्तराखंड विधानसभेचे चित्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड- ६४ लाख मतदार. त्यातील ४८ टक्के महिला मतदार तर, २० टक्के युवक-युवतींचा समावेश
४० टक्के मतदार हे सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांतील आहेत.
निवडणुकीतील मुख्य मुद्दे- भ्रष्टाचार, बेरोजगारी, माजी सैनिकांशी निगडीत समस्या
बंडखोर उमेदवारांचा बोलबाला- उत्तराखंडमध्ये बंडखोरांनी भाजपसह काँग्रेस पक्षाला घरघर लावण्याचे काम केले आहे. भाजपचे दोन मंत्री खजान दास आणि गोविंद सिंह बिष्ट यांच्यासह १२ आमदारांचे तिकिट कापले आहे. दुसरीकडे काँग्रेसने कोणत्याही आमदाराचे तिकिट कापले नाही. असे असले तरी भाजप-काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.
राज्यात तिसरा पक्ष अस्तित्वात- भाजपचे माजी खासदार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) टीपीएस रावत यांनी माजी सैनिकांचा एक पक्ष काढला आहे. उत्तराखंड रक्षा मोर्चा असे या पक्षाचे नाव असून हा पक्ष राज्यातील ७० जागापैकी ४५ जागांवर निवडणुक लढविणार आहे. या पक्षाचा धोका भाजपला सर्वात जास्त बसणार आहे. तरीही स्वच्छ प्रतिमेच्या मेजर जनरल (निवृत्त) बीसी खंडूरी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाला विजयाची खात्री आहे.
११ वर्षात ९ वर्ष भाजपची सत्ता- २००० ते २००२ या काळात येथे भाजपची सत्ता राहिली. नित्यानंत स्वामी राज्याचे पहिले आणि भगत सिंह कोश्यारी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनले. २००२ मध्ये नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे पहिले सरकार सत्तेत आले. २००७ मध्ये भुवनचंद्र खंडूरी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सत्तेत आले. पण भाजपला २००९च्या लोकसभेत मोठी हार पत्करावी लागली त्याची जबाबदारी घेत खंडूरी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्याजागी रमेश पोखरियाल निशंक यांची निवड करण्यात आली. मात्र चारच महिन्यापूर्वी सप्टेंबर ११ मध्ये निशंक यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर पुन्हा खंडूरी मुख्यमंत्रीपद संभाळत आहेत. खंडूरी हे प्रामाणिक नेते असल्याने त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येईल, अशी पक्षातील दिल्लीच्या नेत्यांना वाटते.
राज्याचे महत्त्व- ९ नोव्हेंबर २००० रोजी देशातील २७ वे राज्य म्हणून उत्तरांचल घोषित करण्यात आले. त्यानंतर २००७ साली उत्तराखंड असे नामांतर करण्यात आले. राज्याची राजधानी देहराडून (हंगामी) आहे. राज्य दोन प्रभागात विभागले असून एकून १३ जिल्ह्यांचा समावेश यात आहे. देवाची भूमी मानत असलेल्या राज्यात नद्या, दाट जंगले आहेत. हिंदूच्या पवित्र मानल्या जाणारया बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या नद्या वाहतात.
सद्य राजकीय स्थिती-
भाजप-३५
काँग्रेस- २१
बसपा-८
उत्तराखंड क्रांती दल-३
अपक्ष-३.
निवडणुक तारीख- ३० जानेवारी २०१२
निकाल जाहीर- ६ मार्च २०१२.