आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Mentally Challenged 24 Year Girl Comes To Mumbai Only To Marry Salman Khan

सलमानसोबत लग्न करण्यासाठी त्याच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होती 24 वर्षांची तरुणी, बोलवावे लागले पोलिसांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खानसोबत लग्न करण्याचे स्वप्न उराशी बाळगून एक 24 वर्षीय तरुणी उत्तराखंडहून मुंबईत पोहोचली. इतकेच नाही तर ती तरुणीने सलमानच्या घराचा पत्ता शोधला आणि बळजबरीने त्याच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सलमानच्या बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने कुणाचेही ऐकले नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सलमान घरी नव्हता. तरुणी कुणाचेही ऐकत नसल्याचे बघून अखेर पोलिसांना तेथे बोलवावे लागले. 


मानसिक रुग्ण आहे तरुणी... 
जेव्हा या तरुणीला सुरक्षारक्षकांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरु दिले नाही, तेव्हा ती बराच वेळ बिल्डिंगजवळ भटकत होती. नंतर काही लोकांनी तिला ईस्टर्न फ्रीवेच्या एखा पुलावर भटकताना पाहिले आणि पोलिसांना सुचना दिली. सब इन्स्पेक्टर नारायण तारकुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही 24 वर्षीय तरुणी 11 ऑगस्ट रोजी तिच्या घराबाहेर पडले. मुंबईत पोहोचल्यानंतर तिने गॅलेक्सी अपार्टमेंट गाठले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिची मेडिकल तपासणी करण्यात आली. त्यानुसार, ही तरुणी मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. या तरुणीने काही फोन नंबर्स पोलिसांना दिले, त्यापैकी एक तिच्या वडिलांचा होता. या नंबरवर संपर्क साधून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना कळवले आणि तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. 

बातम्या आणखी आहेत...