आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Police's Unique Decision To Join The Squad By Training The Helpless Dog

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेवारशी कुत्र्यास प्रशिक्षण देऊन पथकात समावेश, उत्तराखंड पोलिसांचा अनोखा निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - आतापर्यंत पोलिसांत परदेशी जातीचे कुत्रे भरती करण्यात येत होते. परंतु उत्तराखंड पोलिसांनी देशात प्रथमच रस्त्यावर फिरणाऱ्या गावठी कुत्र्यांना श्वानपथकात भरती केले. पोलिसांनी त्यांना प्रशिक्षण दिले. तेव्हा तो परदेशी जातीच्या लाखो रुपये किमतीच्या कुत्र्यांनाही भारी ठरला. आता हा कुत्रा उत्तराखंडातील पोलिसांत सर्वात तडफदार असा स्निफर डॉग बनला आहे. पोलिसांना याची हुंगण्याची क्षमता पाहून त्याला आपली ताकद बनवले आहे. या स्निफर डॉगचे ना ‘ठेंगा’ असे ठेवले आहे. स्निफर डॉगचे प्रशिक्षण आयटीबीपी प्रशिक्षण केंद्रात होते. परंतु ठेंगाचे प्रशिक्षण डेहराडून येथे झाले आहे. ९ नोव्हेंबर रोजी पोलिस लाइन मध्ये स्थापना दिवसाच्या निमित्त आयोजित संचलनात त्याने आपल्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे.