आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी निवडणूक निकालापूर्वी केदारनाथाच्या चरणी, मंदिरात केली पूजा-अर्चा, रात्री येथेच करणार मुक्काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहरादून: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दिवसीय यात्रेसाठी केदारनाथला पोहोचले. त्यांनी तेथे पूजा-अर्चा केली. आज रात्री येथेच मुक्काम करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) याची माहिती निवडणूक आयोगालादेखील दिली होती. दरम्यान या दौऱ्याला आमची काहीही हरकत नसल्याचे आयोगाने सांगितले. अयोग अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, ‘पंतप्रधानांची ही अधिकृत यात्रा आहेत, तर ती केली जाऊ शकते. आम्ही फक्त आचारसंहिता लागू असल्याची पीएमओला आठवण करून दिली.' 

 

पोलिसांना मोबाइल वापर करण्यास मनाई : डीजीपी 
उत्तराखंडचे पोलीस महानिरीक्षक (डीजीपी) अशोक कुमार यांनी मोदींच्या दोन दिवसीय यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीदरम्यान मोबाइल फोनचा वापर न करण्याची ताकीद दिली आहे. त्यांनी सांगितले जवानांनी न सांगता ड्यूटीस्थळ सोडू नये. ड्यूटीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल. 

 

केदारनाथमध्येच रात्री विश्राम करणार आहेत मोदी... 
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच केदारनाथमध्ये मुक्कार करत आहेत. त्यामुळे याठिकाणा चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही केदारनाथला आले होते. त्यावेळी त्यांनी जवानांसोबत दिवाळीदेखील साजरी केली होती. 2017 मध्येही दोन वेळा (मे आणि ऑक्टोबर) ते केदारनाथला गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...