आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळलीः 11 ठार, 14 जण जखमी; हेलिकॉप्टरच्या मदतीने काढले मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून - उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी-यमुनोत्री महामार्गावर रविवारी एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात किमान 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच इतर 14 जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस उत्तरकाशी ते विकासनगरला जात होती. त्याचवेळी पुरोला तालुक्याजवळ हा अपघात घडला. बसमध्ये 25 जण प्रवास करत होते. अपघात घडला त्यावेळी बचावकार्य करताना पोलिस आणि बचाव पथकाने 9 जणांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले. सोबतच उर्वरीत सर्वच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...