आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात चोरी झाल्याचे पडले स्वप्न, पोलिसांना फोन, चाेर अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभल - उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एका तरुणास चोरी झाल्याचे स्वप्न पडले. त्याने १०० क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले. अप्पर पोलिस अधीक्षक पंकजकुमार पांडे यांनी सांगितले, हयातनगरात राहणाऱ्या महंमद नासिर याने रात्री दीड वाजता पोलिसांना फोन करून माझ्या घरी चोरट्यांनी १३२ सूटची चोरी केल्याचे सांगितले. 


ठाणेदार रणवीरसिंह पोलिस पथकासह तेथे पोहोचले. घरात चोर आढळले नाहीत. चोरीही झाली नव्हती. दरम्यान, नासिर म्हणाला, मी आजारी आहे. डोक्यात ताप आहे. तापातच चोरी झाल्याचे स्वप्न पडले. त्याच्या वक्तव्याने पोलिस हैराण झाले. पोलिसांनी त्याला खाेटी माहिती दिल्याबद्दल अटक केली. पोलिसांनी त्याला दंडही ठोठावला.

बातम्या आणखी आहेत...