आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AC सारखी हवा देतो हा कूलर, आत बसवले आहे फ्रिजचे कॉम्प्रेसर, AC च्या तुलनेत 90% विजेची बचत होते, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क- उन्हाळ्यात थंड हवा सगळ्यांनाच हवी असते. यासाठी अनेक लोक AC घेण्याचा विचार करतात. पण AC ची किंमत आणि त्याला येणारा विजेचा खर्च सगळ्यांना परवडणारा नसतो. त्यामुळेच ज्यांना AC सारखी हवा पाहिजे असेल, तर वायू त्यांच्यासाठी चांगला पर्याय बनू शकतो. याला बनवणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की, AC पेक्षा कमी विज या कूलरला लागते.


एमपीची इनोव्हेटिव कंपनी
AC सारख्या कूलरला बनवणारी कंपनी वायु होम अप्लायंस मध्यप्रदेशची आहे. या कंपनीचे डायरेक्टर प्रणव मोक्षमार यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीला मध्यप्रदेशच्या बेस्ट स्टार्ट अप कंपनीचा अवॉर्डदेखील मिळाला आहे. त्यांच्या कंपनीचे हे प्रोडक्ट AC चा बेस्ट सब्सिट्यूट आहे. याचे पॉवर कंझप्शन कूलरप्रमाणे आहे तर कूलींग AC प्रमाणे आहे.


कूलरमध्ये लावले आहे कॉप्रेसर
कूलरमध्ये फ्रीजमध्ये वापरात येणारे कॉप्रेसर लावले आहे, ज्यामुळे AC सारखे थंड करतो. कॉम्प्रेसर कूलरच्या पाण्याला थंड करतो आणि पाणी कूलरच्या पॅडवर पडते. यामुळेच नॉर्मल हवादेखील AC सारखी वाटते. AC च्या तुलनेत हे कॉम्प्रेस 90 टक्के कमी पॉवरचा युझ करते.


इतकी आहे किंमत
वायु कंपनीचे हे कूलर 200 वर्ग परिसराला थंड करतो. यात 250 वॉट विजेचा खप होतो. तर या कामासाठी AC 2100 वॉट विज खर्च करते. या कूलरची किंमत 22,500 रूपयांपासून सुरू आहे. MIG 24 नावाचे कूलर 1000 वर्ग फुट परिसराला थंड करतो, त्याची किमंत 85,000 रूपये आहे. कंपनीचे सगळ्यात मोठे कूलर 1.25 लाखांचे आहे. या प्रोडक्टला कंपनीच्या वेबसाइवरून खरेदी करू शकतो.
 

बातम्या आणखी आहेत...