आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मणिकर्णिका\' मध्ये पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारणा-या वैभव तत्त्वादीचे निर्मितीक्षेत्रात पदार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आपल्या अभिनयाने मराठी व हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान अभिनेता वैभव तत्त्ववादीने निर्माण केले. त्याच्या प्रत्येक सिनेमातील अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा वैभव आपल्या नवीन इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

 

वैभवचा अभिनयापासून सुरु झालेला प्रवास त्याला निर्मितीक्षेत्राकडे घेऊन आला आहे. वैभवने आपल्या निर्मितीसंस्थेची स्थापना केली आहे. "ऑटम ब्रीझ फ्लिमझ" असे त्यांच्या निर्मितीसंस्थेचे नाव आहे. या संस्थेअंतर्गत सिनेमाच्या निर्मिती ते व्यवस्थापन अशी कामे पार पडणार आहेत.

 

याशिवाय वैभवचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' हा सिनेमासुद्धा नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमात वैभव तत्त्वादीच लुक डोक्याला मुंडासं बांधलेला दिसणार असून, सिनेमामध्ये  लक्ष्मीबाई यांच्या लढाऊ तुकडीतील एक योंद्धा म्हणून त्याने पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात वैभवच्या बायकोची झलकारी बाईची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेन  साकारली आहे. वैभव आणि अंकिता ह्या जोडीवर एक खास गाणं देखील सिनेमात चित्रित करण्यात आलं आहे. वैभवने या सिनेमात कंगना रानौत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांच्यासोबत काम केले आहे. वैभवच्या या नव्या इनिंगबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...