आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, दोन जण गजाआड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडसपिंपळगाव येथे बालदिनाच्या पूर्वसंध्येला घडला.

या प्रकरणी सोमनाथ अशोक निघोटे (२१), सुदाम कैलास निघोटे (२७, रा. हडसपिंपळगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपीना अटक केली. १७ वर्षीय मुलगी गावात मेंहदीचा कोन खरेदी करण्यासाठी बुधवारी दुपारी १ वाजता गेली होती. दुकान बंद असल्याने घराकडे परत येत असताना आरोपी सोमनाथ निघोटे, सुदाम निघोटे पाठीमागून आले.सुदाम यांनी माझ्या सोबत बंद खोलीत चल असे म्हटला. त्याला विरोध करताच त्यांनी चिडून दोघांनी उचलबांगडी केली. मदतीसाठी पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या श्रीमुखात चापट मारून तोंड दाबून एका बंद खोलीत डांबून तिच्यावर दोघांनी पाशवी बलात्कार केला.या वेळी त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला असता खोलीत पडलेला वीजेचा दिवा फोडून त्या काचेने डाव्या हातावर तुझी नस कापून तुला मारून टाकू असे म्हणत जखमी केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आईवडिलांचा खून करू असे धमकावून दोन्ही आरोपी मुलीला बंद खोलीत कोंडून निघून गेले.तासाभराने आरोपी सोमनाथचा काका वसंत निघोटे हा खोलीकडे आला होता. त्यांनी बाहेरून दरवाजा उघडून त्यांनी तुझ्या घरी तू आमच्या शेतात कापूस वेचण्यासाठी आली होते असे सांगतो, असे म्हणाला असे पीडित मुलीनी वैजापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणीकर यांनी आरोपी सोमनाथ निघोटे, सुदाम  निघोटे  यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे. गंगापूरमधील आंबेलोहाळ येथून आरोपी ताब्यात
 
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानवीय अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक सी. एम. चरभरे, हवालदार दिलीप वेलगुडे, किशोर आघाडे यांच्या पथकाने गंगापूर तालुक्यातील आंबेलोहाळ येथे आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर करीत आहेत.