आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे आणि कसा आहे वैकुंठ? भगवान विष्णूंचे मानले जाते निवासस्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी वैकुंठाधिपती भगवान विष्णू यांच्या विशेष पूजेचे विधान आहे. यावेळी हा उत्सव 22 नोव्हेंबर, गुरुवारी आहे.  या दिवशी व्रत केल्यास वैकुंठ प्राप्ती होते. हिंदू धर्मग्रंथानुसार वैकुंठ हे भगवान विष्णुचे निवासस्थान आहे. तसेच ते पुण्य, शांती आणि सुखाचे माहेरघरह‍ी आहे. देवपुरूष, महात्मा, संत आणि पुण्यवान व्यक्तीला त्याच्या कर्मामुळे वैकुंठ प्राप्त होत असते. धर्मात सांगितलेला वैकुंठाचा अर्थ खूप व्यापक आहे. जो सामान्य लोकांना जगण्याचे मार्ग सांगतो.


ज्याप्रमाने महादेव कैलाश पर्वतावर, ब्रह्मदेव ब्रह्मलोकात राहतात. त्याचप्रमाने भगवान विष्णू वैकुंठात निवास करतात. वैकुंठ चैतन्यमय आहे. ते स्वयं:प्रकाशित आहे. वैकुंठाला साकेत, गोलोक, परमधाम, चिरंतन स्वर्ग, परमस्थान, परमपाद, सनातन आकाश, ब्रह्मपीर अशीही नावे आहेत. पृर्थ्वीवरील सर्वात मोठे असणारे सुखही वैकुंठ सुखाच्या तुलनेने खूप लहान आहे. याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो, की वैकुंठातील सुखापेक्षा दुसरे मोठे सुख कसे असेल. म्हणूनच वैकुंठाला परमधाम म्हणतात. 
 

वैकुंठविषयी अशाच काही रंजक अध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...