आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णवदेवीला जाण्यासाठी अशाप्रकारे करा प्लॅनिंग, 3 दिवसांची यात्रा होईल 4 तासात पूर्ण; पैशांची होणार बचत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : वैष्णवदेवीची यात्रा भारतातील सर्वात पवित्र आणि अवघड समजली जाते. वैष्णवदेवीचे मंदिर जम्मू-काश्मीर येथील त्रिकूट पर्वतातील गुहेमध्ये असल्यामुळे येथे पोहचण्यासाठी 12 किलोमीटरची कठीण चढाई करावी लागते. यासाठी किमान दोन दिवस लागतात तर अनेकवेळा यात्रेकरूंना यासाठी एक आठवडा सुद्धा लागतो. अशातच आपण जर वैष्णवदेवी यात्रेसाठी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. तुम्ही फक्त 4 ते 5 तासांत वैष्णवदेवीचे दर्शन घेऊ शकताल. 

 

वैष्णवदेवीची यात्रा सोयीस्कर झाल्यामुळे मागील 5 वर्षांच्या तुलनेत यावेळी सर्वाधीक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. यावर्षी वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा मागील 5 वर्षातील विक्रम मोडीत निघाला. यावेळी तब्बल 85 लाख भाविकांनी वैष्णवदेवीचे दर्शन घेतले. 

 
चार तासांच्या यात्रेसाठी अशाप्रकारे करा प्लॅनिंग

देशभरातील विविध राज्यातील भक्तगण रेल्वे आणि हवाई मार्गाने जम्मू येथे येतात. कटरा रेल्वेमार्गाला जोडल्यापासून बहूतांश भाविक थेट कटरा येणे पसंत करतात. वैष्णवदेवीला जाण्यासाठी नवीन रस्ता सुरू करण्यात आल्यामुळे जवळपास 1 तास वेळेची बचत होते. वैष्णवदेवीला जाण्यसाठी कटरा येथून हेलीकॉप्टरची सुविधा देखील आहे. यामुळे फक्त 5 मिनिटात कटरापासून मंदिरापर्यंत जाता येते. पण यासाठी तुम्हाला 15 दिवस आधी बुकींग करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 999 रू तिकीट दर आकारण्यात येतो. सध्या सकाळी 8 ते संध्याकाळी 4.30 यावेळेत हेलीकॉप्टरची सुविधा उपलब्ध असते.  

 

बॅटरी कार सेवा
दिव्यांग, आजारी व्यक्ती तथा वृद्ध भाविक भक्तांसाठी श्री वैष्णवदेवी माता श्राइन बोर्डने 2010 पासून अर्धकुमारी ते वैष्णवदेवी मंदिरापर्यंत बॅटरी कारची सेवा सुरू केली आहे. या मार्गावर 25 बॅटरी कार्स सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत भाविकांना सेवा देत आहे. यामुळे दिव्यांग, रूग्ण तसेच वृद्ध भाविकांची अडचण दूर झाली आहे. 

 
रोप वे सेवा 

पौराणिक कथेनुसार भैरवनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय वैष्णवदेवीची यात्रा पूर्ण होत नसल्याचे मानले जाते. आता भैरवनाथाचे दर्शन घेण्यसाठी रोप वे आनंद घेऊ शकता. वैष्णवदेवी मंदिर ते भैरवनाथ दरम्यान रोप वे सुविधा सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला रोपवेसाठी प्रति व्यक्ती 100 रूपये द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत काही लोकच भैरवनाथाचे दर्शन घेऊ शकत होते. पण रोपवे सुरू झाल्यापासून भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. 
 
पुढे वाचा.................अशाप्रकारे करा बुकिंग 

बातम्या आणखी आहेत...