आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमित कर्ण, मुंबई : आपल्या देशात तरुण सध्या व्हॅलेंटाइन डे आणि प्रेमाचा संपूर्ण आठवडा साजरा करतात. ही प्रथा येथे पंधरा वीस वर्षांपूर्वीच आली, परंतु मी तर लंडनमध्येच मोठी झाले, म्हणून आम्हाला या संस्कृतीबाबत पूर्वीपासून माहित आहे. त्यावेळी मी व्हॅलेंटाइन डे साजरा करताना लंडनमध्ये पाहिले आहे. नंतर ज्यावेळी दिलीप साहेब माझ्या आयुष्यात आले तेव्हा लग्नानंतर आम्ही खास व्हॅलेंटाइन डे साजरा केला नाही, परंतु हा दिवस प्रेमाच्या जल्लोष म्हणून साजरा केला आहे. दिलीप साहेबांसोबत आयुष्य दररोज ईदसारखे भासते. त्यांच्यासोबत प्रत्येक दिवस खास होऊन जातो. कधी ते त्यांच्या कवितांनी आणि गाणी गाऊन करमणूक करतात.
आज प्रेम करणारे तरुण रोज डे साजरा करत आहेत आणि लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करत आहेत. एक गोष्ट सांगू, साहेबांच्या आणि माझ्या प्रेमात या लाल गुलाबाची एक खास जागा आहे. ते नेहमी त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देत होते. माझ्या आयुष्यातील खास क्षणांच्यावेळी ते मला सर्वांत खास आणि मोठा गुलाबाचा बुके भेट म्हणून देत होते. ते मटेरिलिस्टिक नाहीत, पण ते गुलाबाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करायचे. आज आत्याचा हा लँडमार्क डे आहे तर आपण तिच्यासाठी तिचे आवडते लाल गुलाब घेऊन येऊया याची आठवण माझी भाची शाहीन त्यांना नेहमी करून द्यायची. मला लाल गुलाब खूप आवडतात हे त्यांना माहित होेते. त्यामुळे ते मला भेट द्यायचे.
ज्यावेळी मी भारतात आले तर मला असे समजले की दिलीप साहेबांना सतार वाजवण्याचा खूप छंद आहे, तर मीदेखील सतार वाजवण्यास सुरुवात केली. दिलीप साहेब उर्दूमध्ये पारंगत होते तर मी देखील उर्दू शिकण्यास सुरुवात केली. माझ्या आईने माझे करिअर सुरू झाल्यानंतर माझे घर बनवण्याचा विचार केला त्यावेळी तिने दिलीप साहेबांच्या घराच्या बाजूचीच जागा निवडली. त्यांच्या घरासमोरच माझे घर बांधले. हे घर त्यांच्या बंगल्यापासून केवळ दोन बंगले लांब होतेे. ते म्हणतात ना, 'तेरे दर के सामने एक घर बनाऊंगा' त्या दरम्यान मी 'मेरे प्यार मोहब्बत' चे चित्रीकरण करत होते. 23 ऑगस्ट 1966 रोजी माझा वाढदिवस होता. याच दिवशी माझ्या आईने माझ्या घराचे वास्तुपूजन ठेवले हाेते. मी फिल्मिस्तान स्टुडिओमधून शूटिंग करून घरी आले तर तेथे पार्टीमध्ये माझे सहकलाकार, दिग्दर्शकांची गर्दी होती. आणि अचानक पाहिले तर दिलीप साहेब स्वत: येताना दिसले. माझ्या आईने त्यांना खास आमंत्रण दिले होते आणि याप्रसंगासाठी ते मद्रास फ्लाइटने सूटबूट घालून, माझ्या पार्टीत आले होते. हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील खूप मोठी भेट होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.