Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Valentine's Day 2019 Love Nature according to Zodiac

नावाच्या पहिल्या अक्षरावरून जाणून घ्या, आपल्या पार्टनरचे लव्ह नेचर 

रिलिजन डेस्क | Update - Feb 13, 2019, 12:01 AM IST

व्हॅलेंटाईन डे : ज्यांचे नाव 'व' अशखरापासून सुरु होत असेल तर प्रेमामध्ये असतात इमोशनल, 'क' अक्षरापासून नाव सुरु होत असले

 • Valentine's Day 2019 Love Nature according to Zodiac

  14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे' आहे. संपूर्ण जगात हा प्रेम करणाऱ्यांचा दिवस मानला जातो. प्रेमाचे नाते विश्वासावर टिकून राहते. तरीही प्रत्येक प्रियकर आणि प्रेयसीच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी घोळत असतो की, त्यांच्या जोडीदाराचा स्वभाव (नेचर) कसा असेल. तो जसा दिसतो तसाच आहे की, त्याचा स्वभाव वेगळा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव नाम राशीने प्रभावित असतो. आपल्या लव्ह पार्टनरच्या राशीनुसार तुम्हीही त्यांचे नेचर सहजपणे जाणून घेऊ शकता. नावाच्या पहिल्या अक्षरावरून जाणून घ्या, आपल्या लव्ह पार्टनरची राशी आणि स्वभावाविषयी...


  राशी आणि नाम अक्षर
  मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
  वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
  मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
  कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
  सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
  कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
  तूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
  वृश्चिक - तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
  धनु - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
  मकर - भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
  कुंभ - गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
  मीन - दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची


  मेष -
  मेष राशीचे लोक आकर्षक आणि प्रभावशाली स्वभावाचे असतात. यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार असते यामुळे कोणतीही मुलगी त्यांच्याकडे पटकन आकर्षित होते. हे लोक घाईगडबडीमध्ये प्रेम करतात आणि यांचे प्रेम जास्त दिवस टिकत नाही.


  वृषभ -
  या राशीचे लोक उत्तम श्रेणीचे प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक प्रेम सबंध तयार करण्यात पटाईत असतात. हे लोक लवकर प्रेम संबंध बनवण्यास सक्षम असतात. या राशीचे लोक प्रेमामध्ये खूप भावूक होतात.


  मिथुन -
  या राशीच्या लोकांचे अनेक प्रेम संबंध असतात. याच कारणामुळे अनेक लोकांचे एका पेक्षा जास्त लग्न होतात. या राशीचे लोक प्रेम सबंध तयार करण्यात पटाईत असतात.


  कर्क -
  या राशीचे लोक प्रेम प्रकरणाच्या बाबतीत फार मूडी असतात. हे आपल्या नात्याप्रती प्रामाणिक असतात. अनेकदा यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आई-वडिलांच्या हस्तक्षेपामुळे अडचणी निर्माण होतात. हे आपल्या जोडीदाराच्या भावनेचा आदर करतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांचा कसा राहतो स्वभाव...

 • Valentine's Day 2019 Love Nature according to Zodiac

  सिंह -
  या राशीच्या लोकांच्या हाव-भावावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची तसेच भारदस्त आवाजामुळे समोरचा माणूस या लोकांवर खुश होतो. यांचा नुसता आवाज ऐकून मुली प्रभावित होतात. हे लोक स्वच्छंदी विचारांचे असतात.यांचे प्रेम संबंध यशस्वी होतात. 


  कन्या -
  या राशीच्या लोकांची गणना महान प्रेमींमध्ये केली जाऊ शकत नाही. हे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात. कोणालाही प्रभावित करण्याची क्षमता या राशीच्या लोकांमध्ये असते. हे खूप चांगले आणि प्रामाणिक जोडीदार ठरू शकतात. 

 • Valentine's Day 2019 Love Nature according to Zodiac

  तूळ -
  या राशीच्या लोकांची गणना महान प्रेमींमध्ये केली जाऊ शकते कारण या राशीचे लोक प्रेमाला चांगल्या प्रकारे समजू शकतात. यांना एकटे राहायला आवडत नाही.दुःखाच्या परिस्थितीमध्ये यांना मित्र किंवा जोडीदाराच्या सहवासाची फार गरज असते. 


  वृश्चिक -
  या राशीचे लोक लग्नापूर्वी उच्च आदर्श प्रेमी असतात. आपल्या प्रेमासाठी हे काहीही करू शकतात आणि कोणत्याही गोष्टीचा त्याग करू शकतात.शास्त्रानुसार या राशीचे लोक आपल्या जोडीदारासोबत नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. 

 • Valentine's Day 2019 Love Nature according to Zodiac

  धनु -
  या राशीचे प्रेमी खूप संवेदनशील आणि स्वच्छंदी असतात. प्रत्येक क्षण आनंदात घावण्याचा यांचा प्रयत्न असतो. शास्त्रानुसार धनु राशीचे लोक चांगले प्रेमी असतात परंतु खूप काळापर्यंत यांचे प्रेम टिकत नाही. याच कारणामुळे यांचे अनेक प्रेमी असतात. 


  मकर -
  मकर राशीच्या लोकांना वाटते की त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही. प्रत्येक कार्य करण्यात ते स्वतः समर्थ आहेत.यामुळे यांचा दुस-याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. हे लोक थोडे जिद्दी स्वभावाचे असतात. 

 • Valentine's Day 2019 Love Nature according to Zodiac

  कुंभ -
  या राशीचे लोक प्रेमळ स्वभावाचे तसेच प्रतिभाशाली असतात. हे लोक भावनिक स्वभावाचे असतात. हे लोक हुशार असतात नवीन एखादी गोष्ट लगेच त्यांच्या लक्षात येते. एखाद्या अनोळखी व्यक्तीवरही हे लोक निस्वार्थी प्रेम करू शकतात. 


  मीन -
  या राशीच्या लोकांचा स्वभाव माशासारखा असतो. या राशीचे लोक अति भावूक असतात. भावुकतेच्या कारणामुळे हे लोक लवकर कोणाकडेही आकर्षित होतात आणि त्याच्या प्रेमात पडतात.यांना कोणीही सहजरीत्या प्रभावित करू शकतो.

Trending