आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- बंगळुरू, काेलकाता अाणि इंदूर या तीन शहरांना जाेडणाऱ्या हाेपिंग विमानसेवेने नाशिकला जाेडण्याबाबत गांभीर्याने पडताळणी केली जार्इल व त्यानंतर निर्णय घेतला जार्इल. याशिवाय नाशिकहून दिल्लीसाठी सुरू असलेल्या विमानसेवेला व कार्गाे सेवेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत अाहे. सध्या अाठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जात असली तरी उद्याेजक व इतर संघटनांच्या मागणीप्रमाणे ही सेवा रोज सकाळी नाशिक-दिल्ली तर सायंकाळी दिल्ली-नाशिक कशी देता येईल यादृष्टीने विचार केला जाईल, असे जेट एअरवेजचे उपाध्यक्ष (सेल्स) गिल्बर्ट जाॅर्ज यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत अाश्वस्त केले.
नाशिकच्या विमानसेवेच्या गरजेवर शिक्कामाेर्तब हाेत असतानाच अाता देशातील प्रमुख इतर शहरांसाठी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न निमाकडून सुरू झाले अाहेत. याच अनुषंगाने मंगळवारी निमा हाऊस येथे झालेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गिल्बर्ट जाॅर्ज, कंपनीचे गाेवा अाणि महाराष्ट्रचे एरिया मॅनेजर याज्दी मार्कर, जनरल मॅनेजर रूचिका सिंग अादी उपस्थित हाेते. नाशिक अाैद्याेगिक, धार्मिक व वाइन पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून येथील वैशिष्ट्यांचे ब्रँडिंग इतर शहरांत तसेच देशाबाहेर केल्यास विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद वाढू शकताे, असे जाॅर्ज यांनी सांगितले.
उद्याेजक पीयूष साेमाणी यांनी नाशिककरांना कुठल्या शहरांसाठी सेवेची गरज अाहे, याबाबतच्या साेशल मीडियावरील सर्वेक्षणाचे सादरीकरण केले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी उद्याेजक व अन्य संघटनांकडून सहकार्य मिळत राहील याची ग्वाही दिली. खासदार हेमंत गाेडसे यांनी सध्याची सेवा राेज अाणि सकाळ-सायंकाळी मिळाल्यास काॅर्पाेरेट जगताला दिलासा मिळू शकेल अशी मागणी केली. नाशिक सिटिझन फाेरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, क्रेडार्इचे जितेंद्र ठक्कर, निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, जनरल सेक्रेटरी तुषार चव्हाण, मनीष काेठारी, अायमाचे अध्यक्ष वरुण तलवार, ट्रॅव्हल एजंट्स; असाेसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव, सुधाकर देशमुख, ललित बूब अादी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.