आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिलगिट बाल्टिस्तानमध्ये अनियंत्रित व्हॅन सिंध नदीत कोसळली; 21 जणांचा मृत्यू तर 4 जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींना लष्कराच्या एअर अँब्युलंसच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले

इस्लामाबाद- पाकव्याप्त काश्मीरातील गिलगिट बाल्टिस्तानमध्ये सोमवारी एक व्हॅन अनिंत्रित होऊन सिंध नदीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी आहेत. पोलिस कमिश्नर खुर्रम परवेज यांनी सांगितले की, व्हॅनमधील प्रवासी रावळपिंडीवरुन स्कार्दुकडे येत होते. यादरम्यान रोंदु परिसरात चालकाचा व्हॅनवरील ताबा सुटला आणि गाडी नदीत कोसळली.


अपघाताची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. जखमींना लष्कराच्या हेलिकॉप्टर आणि अँब्युलंसच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये पाठवले. काही मृतदेह नदीत वाहून गेले आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे.

गतवर्षी 26 जणांचा झाला होता मृत्यू


मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये रावळपिंडीवरुन स्कार्दुकडे जाणाऱ्या एका बसचा दियामेर जिल्ह्यातील बाबूसर जवळ अपघात झाला होता. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 जण जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...