आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखाची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- जेसीबी मशीन व ट्रॅक्टर सोडण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उपखेड (ता.चाळीसगाव) येथील वनरक्षकास जळगावच्या लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चाळीसगाव वन विभागाच्या कार्यालयात झाली. प्रकाश विष्णू पाटील (५०) असे या वनरक्षकाचे नाव असून तो चाळीसगावमध्ये राहतो.  


तक्रारदाराचे  स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन असून ते वन विभागाच्या हद्दीत मुरूम उत्खनन करताना वनरक्षक प्रकाश पाटील यांना आढळले होते. त्यांनी तक्रारदाराने मुरूम उत्खनन करून चोरी केल्याचे सांगून जेसीबी चाळीसगाव वन विभागाच्या कार्यालयात जमा केले होते. तक्रारदाराने वन विभागात जाऊन वनरक्षक प्रकाश पाटील यांची भेट घेतली. तक्रारदाराला नऊ लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. दंड भरत नसाल तर एक लाख ६० हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे फिर्याद दिली. त्यानुसार ठरलेल्या दिवशी पाटील याला १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...