आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित आणि एमआयएमची युती अखेर तुटली; जलील यांचे वक्तव्य हीच पक्षाची अधिकृत भूमिका - असदुद्दीन ओवेसी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली असल्याचे समोर आले आहे.

एमआयएमने केली होती 100 जागांची मागणी 
एमआयएमने महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 100 जागांची मागणी केली होती परंतु वंचितने फक्त 8 जागा देण्यास तयारी दर्शवली होती. जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएमने आघाडीतून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. 
 
असदुद्दीन ओवेसी एमआयएम आणि वंचितच्या युतीबाबत बोलत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. मात्र ओवेसी यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम वेगवेगळे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...