आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत ऐनवेळी बदलला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार; तांत्रिक कारणांमुळे डॉ. अरुण साबळेंना डच्चू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अरुण साबळे आणि संजय सुखदान - Divya Marathi
डॉ. अरुण साबळे आणि संजय सुखदान

शिर्डी - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेससारख्या बड्या पक्षांना आव्हान देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार ऐनवेळी बदलला आहे. सांगलीनंतर आता शिर्डीत सुद्धा ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुण साबळे यांची उमेदवारी परत घेतली. शिर्डीतून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते आज अर्ज देखील दाखल करणार होते. परंतु, तांत्रिक कारण दाखवून अचानक त्यांचे नाव खोडून शिर्डीतून संजय सुखदान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय सुखदान हे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष होते. ते आजच (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

सुखदान यांनी 29 मार्च रोजीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच 1 एप्रिलपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीसाठी लढण्याची तयारी असली तरीही त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळत नव्हते. तर वंचित बहुजन आघाडीने आधीच शिर्डीतून डॉ. अरुण साबळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. तरीही सुखदान यांच्यासाठी ऐनवेळी बदल करून साबळेंना उमेदवारी न देता सुखदान यांना देण्यात आली.