आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचितने काँग्रेसशी संपर्क ताेडला, एमआयएमशी संकल्प कायमच!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'राज्यात विधानसभेला काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा 'वंचित'ने आटोकाट प्रयत्न केला, पण काँग्रेस चालढकल करत असून बोलणी करण्याचा केवळ देखावा करत आहे. म्हणून यापुढे काँग्रेसशी आघाडीची कोणतीही चर्चा करणार नाही,' अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली. 'एमआयएमशी आघाडी कायम असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत आपण त्यांची वाट पाहणार आहोत. गणपती विसर्जनानंतर उमेदवारांची यादी घोषित केली जाईल,' असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अॅड. आंबेडकर म्हणाले, 'काँग्रेस नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी होऊ नये म्हणून काँग्रेसने आमच्याबरोबर आघाडी करण्यात चालढकल केली. तसेच आघाडी करण्यास वंचितच तयार नाही, असा गैरसमज पसरवला. काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व चर्चेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत आहे. लोकसभा निवडणुकीत असेच झाले. या पार्श्वभूमीवर वंचितने काँग्रेससाठी थांबायचे नाही, असा निर्णय घेतला आहे,' असे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. अॅड. आंबेडकर म्हणाले... - शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय गांभीर्याने रेटला पाहिजे, अन्यथा आदित्यचासुद्धा अपयशी राहुल गांधी होईल. - आता ईव्हीएम हॅक होणार नाहीत. कारण माेठ्या प्रमाणातील हॅकिंगमुळे हा उद्योग धोक्यात आहे. आता हॅकर्सच असे प्रकार रोखतील. - जम्मू-काश्मिरात कलम ३७० रद्द करून भाजपने भारतात नवा धगधगता पॅलेस्टाइन जन्मास घातला आहे.

बातम्या आणखी आहेत...