आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न संपणारी शिदोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पुनर्वसनाच्या कामाला गती आणि प्रगती देण्याचं खूप मोठं श्रेय लोकसहभागाबरोबर महिलांचंही आहे,’ राज्य शासन आणि जागतिक बँकेनं मराठवाड्यातल्या भूकंप पुनर्वसनासंदर्भात केलेली ही प्रशंसा. यामधे स्त्रियांच्या कामाचा स्वतंत्र उल्लेख केला जाणं हे इथल्या महिलांचं वेगळेपण अधोरेखित करतं. दोन दिवसांच्या दौऱ्यात इथल्या महिलांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जाणवलं. स्त्री-मुक्ती, स्त्री समानता चळवळ वगैरे संकल्पनांपासून त्या कोसो दूर आहेत. देशविदेशातल्या महिला विश्वातल्या घडामोडींबद्दलही त्या अनभिज्ञ आहेत. शहरी महिलांना मिळणाऱ्या भौतिक सुखसोयींचं वारं अजून त्यांच्या गावच्या वेशीवरही आलेलं नाही. मात्र डोक्यावरच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ घालायचंय, त्यासाठी दोन पैसे गाठीशी बांधायला हवेत, एवढं त्यांना पक्कं ठाऊक आहे. हे पैसे कमवायला मिळणं इतकाच त्यांच्या लेखी स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ आहे. त्यासाठीच हातात हात गुंफून पुनर्वसनाचा हा प्रवास त्यांनी केला. भूतकाळाला मागे टाकून त्यांचा हा प्रवास आजही सुरू आहे. ही त्यांच्यासाठी न संपणारी शिदोरी ठरलाय. पुनर्वसनाचा आढावा घेणाऱ्या लेखमालेतला हा समारोपाचा भाग...


गोदावरी डांगे :
पुनर्वसनाची माहिती घेण्याच्या या दौऱ्यात लक्षात राहिल्या गोदाताई. स्वयं शिक्षण प्रयोग  (एसएसपी) या संस्थेच्या कामाची उत्साहानं माहिती देणाऱ्या. भरभरून बोलणाऱ्या, चेहऱ्यावर कायम हास्य असणाऱ्या गोदाताईंचा भूतकाळ समजला आणि मी क्षणभर अवाक झाले. त्या तुळजापूरातल्या गंधोरा गावच्या. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. दोन लहान मुलं पदरात टाकून नवऱ्यानं जगाचा निरोप घेतला. गोदाताईंसाठी तो धक्का खूप मोठा होता. त्या धक्क्यातून सावरणं तर दूरच पण मानसिक रुग्ण होण्यापर्यंत त्यांचं दुखणं बळावलं. मुलांसाठी उभं राहायलाच हवं ही जाणीव त्यांना माहेरच्यांनी करून दिली. त्यानंतर त्या स्वयं शिक्षण प्रयोगच्या बचत गटांच्या संपर्कात आल्या. या बायकांसोबतच्या सततच्या संपर्कामुळे गोदाताईंना दु:खातून बाहेर यायला मदत केली. वर्षभरातच गोदाताईंनी स्वत:चा महिला महासंघ स्थापन केला. 


आज या संघाच्या पाच हजार महिला सदस्य आहेत. पर्यावरण पूरक शाश्वत शेती, अन्नसुरक्षा, जलसंरक्षण, स्त्रियांचं आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य, पोषक आहार, शौचालयं या क्षेत्रातलं गोदाताईंचं आजवरचं काम दखल घ्यावी असं आहे. पुनर्वसन काळातल्या या कामाची माहिती देण्यासाठी, बचत गटाच्या माध्यमातून काय आणि किती साध्य करता येऊ शकतं याच्या प्रात्यक्षिकासाठी गोदाताईंनी जगातल्या १५ देशांमधे प्रवास केलाय. अवघ्या सातवी शिकलेल्या गोदाताईंची ही झेप अचंबित करणारी आहे.


पुढील स्लाइडवर वाचा, आणखी महिलांविषयी...

बातम्या आणखी आहेत...