आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर(उत्तरप्रदेश)- नवी दिल्लीवरून वाराणसीला जाणारी 'वंदे भारत एक्सप्रेस'वर रविवारी परत दगडफक करण्यात आली. अडकली. काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून 10 डब्यांच्या 15 खिडक्या फोडल्या. दगडफेक सुरू झाल्यावर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रवाशांनी सीटाखाली आश्रय घेतला. दगडफेकीची सुचना मिळताच रेल्वे पोलिसांनी अॅक्शन घेण्यास सुरूवात घेतली. घाई-घाईत जीआरपी, आरपीएफ आणि स्थानीय पोलिसानी दगडफेक झालेल्या जागेवर जाऊन चौकशी केली. घटनास्थळी जीआरपीला तुटलेल्या खिडक्यांची काच आढळली.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस आपली ठरलेली वेळ पौने आकरा वाजता कानपूर सेन्ट्रल स्टेशनवर पोहचली. तेथून निघ्याल्यावर पुढे ती महाराजपूर परिसरातील सरसौल आणि प्रेमपूरच्या मध्ये होती, तेव्हा काही अज्ञातांनी ट्रेनवर दगडफेक करणे सुरू केले. यावेळी घाबरलेल्या लोकांनी सीटखाली लपून आपला जीव वाचवला.
माहिती मिळताच पोलिसांनी घेतली अॅक्शन
या दगडफेकीच्या दरम्यान ट्रेनच्या ड्रायव्हरने रेल्वे आधिकाऱ्यांना या दगडफेकिची माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ जीआरपी आणि आरपीएफला घटनास्थळी रवाना केले. आधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची चौकशी केली पण हल्लेखोरांची माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर अज्ञातांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.