आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vani Kapoor Shared A Photo, In That She Wear Bikini Top Written By Hare Ram, Latter On She Deleted The Photo Due To Trolling

वाणी कपूरने 'हरे राम' लिहिलेले बिकनी टॉप घालून शेअर केला होता फोटो, ट्रोल झाल्यामुळे डिलीट केला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वाणी कपूरने 11 नोव्हेंबरला एक फोटो आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला होता, ज्यामध्ये तीने राम हे नाव लिहिलेले बिकनी टॉप घातले आहे. या टॉपवर प्रभू रामाचे नाव पाहून यूजर्स भडकले आणि वाणीला खूप खरी खोटी ऐकवली. सोशल मीडियावर आपले एवढ्या वाईट पद्धतीने ट्रोलिंग होत असलेले पाहून वाणीने ही पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत हा फोटो खूप व्हायरल झाला होता. जो अजूनही शेअर होत आहे.  

अशाप्रकारे ट्रोल झाली वाणी... 
शांडिल्य संजय तिवारी नावाच्या एका यूजरने लिहिले, 'हे तेच लोक आहेत जे प्रसिद्धी आणि पैशासाठी काहीही करू शकतात. आणि सर्वकाही करूनही उपयोग ना झाल्यानंतर मीटू सारख्या गोष्टीसोबत परत येतात. 

सुयोग नावाच्या एका यूजरने लिहिले, प्रश्न हा आहे कि, लोक असे कपडे घालतात का ? ते प्रत्येक गोष्टीचा फॅशन म्हणून उपयोग करतात. कारण आपण कोणतेही ठोस पॉल उचलत नाहीत. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे आणि याप्रकारची मूर्ख हरकत नाही केली पाहिजे. हे त्वरित हटवावे.  

सावला परमार नावाच्या एका यूजरने पोलिसांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची अपील केली आहे. परमारने लिहिले, बोललीवूड अभिनेत्री वाणी कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आहे. जे कपडे घातले आहेत त्यावर आराध्य प्रभु श्रीराम यांचे नाव लिहिलेले आहे, याचा विरोध करतो. या फोटोने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुंबई पोलिसांनी यावर सक्त कारवाई करावी.