रक्ताने स्नान, अतृप्त / रक्ताने स्नान, अतृप्त आत्मा बोलावणे, येथे असे असते दिवाळीच्या रात्रीचे दृश्य

रिलिजन डेस्क

Nov 06,2018 12:03:00 AM IST

वाराणसी : दिवाळीच्या रात्रीचे मणिकर्णिका घाटावरील दृश्य प्रत्येकाचा हादरून टाकेल असे असते. साधक सर्वात पहिले कवटीला रक्ताने अंघोळ घालतो, त्यानंतर जळत्या चितेसमोर कवटी हातामध्ये घेऊन एक पायावर तासंतास उभे राहून शव साधना करतो. divymarathi.com तुम्हाला या तंत्र साधनेविषयी खास माहिती देत आहे. यासाठी पिठाधीश्वर महास्मशान बाबा नागनाथ यांच्याशी चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच बाबाना देवाज्ञा झाली आहे.


कवटीमध्ये खप्पर(मातीच्या भांड्याचा फोडलेला अर्धा खंड) भरून जळत्या चितेसमोर करतात साधना
- काशी एकमेव असे ठिकाण आहे, जेथे महादेव स्वतः अघोर महादानी रूपात महास्मशानमधेय विराजमान आहेत.
- तामसिक क्रिया करण्यासाठी कवटीमध्ये खप्पर भरून 40 मिनिट आरती केली जाते.
- ही साधना करणाऱ्या व्यक्तीला चमत्कारिक सिद्धी प्राप्त होतात. या दरम्यान साधक आपले मंत्र आणि कार्य सिद्ध करतो.
- स्मशानात बसून महाकालीची उपासना आणि शक्तीचे आवाहन केले जाते.
- नारळ आणि लिंबूचा बळी दिला जातो. या साधनेला तामसी क्रिया म्हणतात.


दिवाळीच्या रात्री आत्म्यांचे केले जाते आवाहन
- मान्यतेनुसार अनादी काळापासून दिवाळीच्या रात्री तंत्र साधना केली जाते.
- मणिकर्णिका घाटावर स्म्शान नाथ मंदिरात दिवाळीच्या रात्री विशेष अनुष्ठान केले जाते.
- बाबाच्या साधनेमध्ये तामसी नैवेद्यासोबत 11 खप्परमध्ये दारू भरली जाते. जळत्या चितेसमोर पूजा होते.
- रात्रभर तामसी रूपात महादेवाची खास तंत्र साधना चालू असते.
- या साधनेमध्ये अतृप्त आत्मा म्हणजे ज्यांना मुक्ती मिळाली नाही त्यांचे आवाहन केले जाते.
- यांना तंत्र पूजेने मोक्ष प्राप्ती करून दिली जाते.
- मान्यतेनुसार मणिकर्णिका महास्मशान या ठिकाणीच हजारो वर्षे तपश्चर्या केल्यानंतर महादेवांनी भगवान विष्णू यांना संसार संचालनाचे वरदान दिले होते.
- याच घाटावर महादेवांनी मोक्ष प्रदान करण्याची प्रतिज्ञा केली होती.


पुढील स्लाईड्सवर पाहा, दिवाळीच्या रात्री केल्या जाणाऱ्या तंत्र साधनेचे खास फोटो...

X
COMMENT