Home | Maharashtra | Pune | varavara rao application for bail in pune jail

भावजयीच्या अंत्यविधीसाठी वरवरा राव यांचा जामीन अर्ज

प्रतिनिधी | Update - Apr 23, 2019, 08:34 AM IST

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या विद्रोही कवी आणि लेखक वरवरा राव यांनी विशेष न्यायालयात केली आहे. 

  • varavara rao application for bail in pune jail

    पुणे - भावाच्या पत्नीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या विद्रोही कवी आणि लेखक वरवरा राव यांनी विशेष न्यायालयात केली आहे.


    सध्या राव हे येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या भावजयीचे सोमवारी निधन झाल्याची माहिती त्यांना कळली. मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाल्याने घरात वरवरा रावच मोठे आहेत. निधनानंतर ९ ते १२ दिवसांपर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित राहणे गरजेचे असल्याने त्यांनी २९ एप्रिल ते ४ मेदरम्यान तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अन्यथा एस्कॉर्टच्या (पोलिस बंदोबस्तात) उपस्थितीत धार्मिक विधीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी राव हे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.


    ‘पेड्डा कर्मा (धार्मिक विधी)’ मध्ये दहाव्या दिवसाला महत्त्व असून त्याला दशा दिन कर्म असे संबोधले जाते. या विधींसाठी अ‍ॅड. राहुल देशमुख आणि अ‍ॅड. पार्थ शहा यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत तपास अधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील यांना न्यायालयाने म्हणणे सादर करण्यास सांगितले असून अर्जावरील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे.

Trending