आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाकडून व्हीव्हीपॅट यंत्रात काही किरकाेळ बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणुकांत मतदानासाठी वापरात येणाऱ्या ईव्हीएमवरून नेहमी वाद उद््भवत आहेत. या ईव्हीएममधील काँट्रास्ट सेन्सर आणि पेपर रोलवर आर्द्रतेचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने या यंत्रात काही किरकोळ बदल केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी दिली. 


नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील कैराना व महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया यासह चार लोकसभा आणि दहा विधानसभा पोटनिवडणुकांत मतदान केंद्रावरील अनेक व्हीव्हीपॅट यंत्रांत बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या तंत्रज्ञ समितीने या यंत्रातील मूळ दोष शोधून काढला. निवडणूक आयुक्त रावत यांनी सांगितले, पेपरच्या यंत्रावर थेट प्रकाश पडत असल्याने यंत्रात बिघाड होत होता. तसेच यातील पेपर रोल वातावरणातील आर्द्रता शोषून घेत होता. त्यामुळे पेपरवर मतदान छपाई होत असताना व्हीव्हीपॅट यंत्रातील पेपर रोल योग्य रीतीने फिरत नव्हता. 


या यंत्रात काही किरकोळ बदल करण्यात आले. काँट्रास्ट सेन्सरवर आवेष्टन देण्यात आले. त्यामुळे आता पेपर रोलवर थेट प्रकाश पडला तरी त्यात बिघाड होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ईव्हीएमवर मात्र आर्द्रतेचा अथवा उष्णतेचा काही परिणाम होत नाही, असे रावत यांनी स्पष्ट केले. व्हीव्हीपॅट (voter- verifiable paper audit trail)मध्ये मतदार ज्या पक्षाला मतदान करतो त्याची निशाणी या पेपरवर छापून येते. मतदाराला सात सेकंद ही स्लीप दिसते आणि ड्रॉप बॉक्समध्ये पडते. पण मतदाराला ती घरी नेता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...