आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीसाठी वैविध्यपूर्ण गिफ्ट्सचे पर्याय, स्वभावानुसार बदलणारे गिफ्ट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - यावर्षीच्या दीपोत्सवात प्रियजनांना आणि आप्तेष्टांना खास भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठेत विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्येकाच्या वापरानुसार, प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि भेट देणाऱ्या व्यक्तीच्या आवडीनुसारच नव्हे, तर व्यक्तीच्या स्वभावानुसार गिफ्ट देण्याचा ट्रेंड पहायला मिळत आहे. यात हँडमेड पॅकिंगला मिळणारी पसंती आणि हँडमेड गिफ्ट्स सध्या प्राधान्याने घेतले जात आहेत. 


प्रत्येकाला दिवाळीमध्ये आनंद वाटण्याची इच्छा असते, कुठे गोड खाद्यपदार्थांच्या स्वरूपात तर कुठे सुगंधाच्या स्वरूपात या सणानिमित्त आनंद 'शेअर' केला जातो. यामध्येदेखील तरुणांच्या पसंती वेगळ्या, कॉर्पोरेट गिफ्टिंग वेगळे, घरगुती वापराच्या वस्तूदेखील गिफ्टिंगचे वेगळे पर्याय ठरत आहेत. यामध्ये पर्यावरणपूरक वस्तू ज्यांमध्ये प्लास्टिकविरहित वस्तू किंवा कापडापासून आणि कापडाच्याच पॅकिंगमध्ये बांधलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तसेच घरामध्ये वापरली जाणारी भांडी, क्रॉकरी सेट, काचेच्या वस्तूंनादेखील मागणी आहे. याव्यतिरिक्त नेहमीप्रमाणे दिवाळीच्या दिवसांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ड्रायफ्रूट पॅकिंगमध्येदेखील पर्याय पहायला मिळतात. यावर्षी स्टेशनरी, पुस्तके आणि पेन स्टँड या वस्तू कॉर्पोरेट गिफ्ट्समध्ये अग्रस्थानी आहेत. यावर्षी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या काही गिफ्ट पर्यायांचे वर्गीकरण केल्यास पुढील पर्याय पहायला मिळतात. 


कॉर्पोरेट गिफ्टिंगचा ट्रेंड, कस्टमायझेशनला मागणी 
कॉर्पोरेट किंवा प्रोफेशनल गिफ्टिंगमध्ये पेन स्टँड, स्टेशनरी, डायरी आणि पेन सेट, गोल्ड किंवा सिल्व्हर प्लेटेड बाउल या गोष्टींना मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून सेट झालेला हा ट्रेंड आता बऱ्यापैकी हँडमेडकडे वळताना दिसतो. यामध्येदेखील डायरी, पेन किंवा पेन स्टँडसारख्या गोष्टींवर नाव, कंपनीचा लोगो टाकून कस्टमायझेशन करण्याची आवड निर्माण झाली आहे. - अश्विनी भावसार-शाह, गिफ्ट बर्ड‌्स 


सुगंधी गिफ्ट्स : या पर्यायामध्ये सुगंधी मेणबत्ती, फ्लोटिंग कँडल्स, रंगीत धूप, सेंटेड फुलांचे शोपीस, ऑफिस टेबल शोपीस या गोष्टी उपलब्ध आहेत. यांच्या किमती साधारण ३० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत आहेत. 

 


चॉकलेट गिफ्ट्स : यामध्ये वेगवेगळे आकार तर पहायला मिळतातच, शिवाय पॅकिंगमध्येदेखील वैविध्य पहायला मिळते. जसे कापडामध्ये पॅक केलेले चॉकलेट्स, बरणीच्या आकाराचे चॉकलेट्स, बाहुली टेडी बेअरसारखे चॉकलेट्स पहायला मिळतात. यांच्या किमती १०० रुपयांपासून दाेन हजार रुपयांपर्यंत आहेत. 


ड्रायफ्रूट्स : सगळ्यात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी आहेत. यावर्षी ब्रीफकेसमध्ये ड्रायफ्रूट आणि घड्याळ किंवा डायरी असा प्रोफेशनल गिफ्ट पॅक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या शिवाय वूडन बॉक्स, पेटी, चांदी किंवा सोन्याचे प्लेटिंग असणारे डबे हेदेखील मुख्य आकर्षण ठरतात. यांच्या किमती ४३० रुपयांपासून ३ हजार १०० रुपयांपर्यंत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...