आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिणमध्ये इंग्रजी सबटायटल्ससोबत रिलीज होणार 'सुई धागा', देसी अंदाजात दिसणार ममता-मौजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा आगामी सिनेमा 'सुई धागा' दक्षिण भारतात इंग्रजी सबटायटल्ससोबत रिलीज होणार आहे. कारण या चित्रपटात असे काही डायलॉग्स आहेत, जे वेगळ्या स्टाइलमध्ये बोलले आहेत. जे दक्षिण भारतीयांना समजणे थोडे अवघड होऊ शकते. वरुण-अनुष्काचा हा सिनेमा 28 सप्टेंबर रोजी देशभरात रिलीज होईल. 

 

ममता-मौजीचा दिसेल देसी अंदाज 
या चित्रपटात वरुणने मौजी नावाच्या शिंप्याची आणि अनुष्काने ममता नावाच्या एका सामान्य महिलेची भूमिका साकारली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर हा सिनेमा आहे. यामध्ये ममता आपला पती मौजीचा अपमान सहन करु शकत नाही आणि त्याच्यातील हुनर ओळखण्यास त्याला मदत करते. या चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशात झाली आहे. 

 

फक्त 25 कोटींचे आहे चित्रपटाचे बजेट 
यशराच फिल्मच्या या सिनेमाचे बजेट फक्त 25 कोटी आहे. सिनेमाला ओपनिंग डेला चांगली कमाई होणार अशा अपेक्षा आहे. शरत कटारिया यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...