आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांक खेतानच्या नव्या चित्रपटाची चर्चा, स्पाय थ्रिलरमध्ये काम करणार वरुण-आलिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वरुण धवन आणि आलिया भट्ट जोडी यशस्वी मानली जाते. शशांक खेतानच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मध्ये त्यांनी काम केले होते. शशांकने त्यांनी अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये कास्ट केले आहे. धर्मा प्रॉडक्शन्सच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशांक आता दोघांना एका स्पाय थ्रिलर चित्रपटात घेणार आहे. याबाबत शशांकला विचारले असता तो म्हणाला, 'हा एस्पियोनाज थ्रिलर चित्रपट आहे. यावर मी लेखन केले आहे. लवकरच आम्ही याची घोषणा करणार आहोत. सध्या चित्रपटावर चर्चा करणे घाईचे ठरेल. त्यामुळे वाट पाहणेच पर्याय आहे. आम्ही योग्य संधी आल्यावर नक्कीच सांगू.' 


शशांक पुढे म्हणाला..., 'सध्या देशामध्ये थ्रिलरपटांना कमी एक्सपोझर मिळत आहे. मी आपल्या थ्रिलरमध्ये एक मुद्दा इन्कॉरपोरेट करत आहे. साहजिकच याबाबत जसजशी मान्यता मिळत जाईल आम्ही पुढे चाल राहू. अॅमेझॉन प्राइम इंडिया आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'जॅक रायन'सारखे थ्रिलर लोकांना खूप आवडत आहेत. तथापि, तो कंटेंट तर मी पाहिलाच नाही. मात्र, आमची एका भारतीय एजंटाची कथा असेल. आम्ही सत्य घटनांना स्पर्श करणार नाही. आमची कथा पूर्णपणे फिक्शनल असेल. आता यात माझे लकी मॅस्कट असतील की नाही, हे मी तुम्हाला सध्या तरी सांगणार नाही. तारखा आल्यानंतर आम्ही अवश्य अधिकृतपणे सांगू.' 

 

वरुण-आलियाच्या प्रश्नावर... 
'ज्या लकी मॅक्सटसोबत काम करण्याची मी इच्छा बाळगली, त्या संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या आहेत. वरुण आणि आलिया माझ्या चित्रपटांमध्ये असतात तेव्हा खूप मजा येते. मात्र, सध्या कोणतेही वक्तव्य करणे घाईचे ठरेल. आम्ही लवकरच घोषणा करू.' 

बातम्या आणखी आहेत...