Home | Gossip | varun dhawan and alia bhatt dances bhangda in jalandhar for pramotion of film 'kalank'

'कलंक' च्या रिलीजच्या चार दिवस अगोदर वरुण-आलियाने पंजाबमध्ये केला 'फर्स्ट क्लास' भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 11:45 AM IST

वरुण-आलियाच्या डान्सला फॅन्सने केले चीयर... 

 • varun dhawan and alia bhatt dances bhangda in jalandhar for pramotion of film 'kalank'

  मुंबई : वरुण धवन आणि आलिया भट्ट अशातच पंजाबच्या जालंधरमध्ये फिल्म 'कंलक' च्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. जिथे दोन्ही स्टार्सने 'फर्स्ट क्लास' या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्हज दाखवले. हा व्हिडीओ वरुणने आपल्या पर्सनल ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, 'रूप' आणि 'जफर' यांचा जालंधरमध्ये एक सुंदर दिवस ! तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि प्रेम" व्हिडीओ मध्ये तो 'फर्स्ट क्लास' या गाण्यावर भांगडा करताना दिसत आहे. यासोबतच वारू ते गाणे म्हणतदेखील होता.

  पंजाबी लुकमध्ये दिसले दोघे...
  व्हिडिओमध्ये वरुणचा पंजाबी लुक पाहायला मिळत आहे. त्याने कुर्ता-पायजम्यासोबत एक जॅकेट घातले आहे. आलियादेखील एखाद्या पंजाबी मुलीपेक्षा कमी दिसत नाहीये. तिने ब्लू अटायरसोबत पिंक कलरचे जॅकेट घातले आहे. तिथे असलेले फॅन्स त्यांच्या डान्सचा आनंद घेता हेत आणि खूप ओरडत आहेत.

  17 ला रिलीज होईल 'कलंक'...
  धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेली फिल्म 'कलंक' 17 एप्रिलला रिलीज होणार आहे. ही मल्टीस्टारर फिल्म आहे. यामध्ये वरुण-आलियाव्यतिरिक्त संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर लीड रोलमध्ये आहेत. या मुव्हीमध्ये संजय आणि माधुरी २२ वर्षानंतर ऑनस्क्रीन दिसणार आहेत. या जोडीला शेवटचे 1997 मध्ये फिल्म 'महानता' मध्ये पहिले गेले होते.

Trending