आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कलंक'चित्रपट फ्लॉप झाला असूनही वरून धवन हिट, 'स्ट्रीट डान्सर'साठी वरुणला मिळाले 21 कोटी मानधन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : वरुण धवन सध्या रेमो डिसुझाच्या 'स्ट्रीट डान्सर' मध्ये काम करत आहे. या चित्रपटात त्याला मिळालेल्या मानधनाची मार्केटमध्ये जास्त चर्चा आहे. ट्रेड तज्ञांच्या मते, वरुणला या चित्रपटासाठी 33 कोटी रुपये मिळाले आहेत. आधी वरुणने हा अंदाज नकारला होता, मात्र आता स्वत: त्याने मान्य करत या चित्रपटासाठी आपल्याला 21 कोटींपेक्षा जास्त मिळाल्याचे सांगितले आहे. नुकतेच वरुणने एका चॅट शोमध्ये सांगितले की, मला या चित्रपटासाठी 33 कोटी रुपये तर नाही, मात्र 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त दिले गेले आहेत. पैसे येत आहेत ही तर चांगली गोष्ट आहे ना ? खरं तर, जगण्यासाठी त्यापेक्षा कमी पैसेदेखील चालतात. 

 

ट्रेड तज्ञांनी व्यक्त केले होते मत...  
नुकतेच वरुण धवन अभिनीत चित्रपट कलंक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर वरुणचे मार्केट डाउन होत असल्याची चर्चा सुरू होती. यावर ट्रेड तज्ञांनी आपले मत व्यक्त केले होते. काही म्हणाले होते, आता त्याचे करिअर संपण्याच्या दिशेने आहे. काही म्हणाले होते, तो इतका मोठा स्टार आहे की, एखाद्या फ्लॉप चित्रपटाने त्याच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. 

 

70-80 च्या दशकाची बात औरच...  
ट्रेड तज्ञांच्या मते, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अभिनेत्यांचे एक किंवा दोन चित्रपट फ्लाॅप झाले तरी त्यांच्या करिअरवर काहीच परिणाम होत नव्हता. त्यांना पुढेही चित्रपट मिळायचे. मात्र आज असे नाही. एक चित्रपटही फ्लॉप झाला तर पुढे चित्रपट मिळत नाही. मात्र वरुणच्या बाबतीत असे पाहायला मिळाले नाही. 

 

का नाही झाला फ्लॉपचा परिणाम...  
- 'कलंक' जर वरुणचा सोलो चित्रपट असता तर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम झाला असता. मात्र चित्रपट दिग्दर्शन आणि कथेमुळे हिट झाला नाही. 
- प्रत्येक चित्रपटात वरुणची मेहनत दिसते. प्रत्येक पात्रासाठी तो मेहनत घेतो. त्यामुळेच तो निर्मात्यांना आवडतो. 
- वरुणच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याला महिला, मुले आणि ज्येष्ठांची पसंती मिळते. 

 

कॉर्पोरेट स्टुडिओजमुळे बदलला सर्व खेळ...  
चित्रपट निर्मिती आणि वितरणाचे काम जेव्हापासून वैयक्तिक निर्मात्यांऐवजी कॉर्पोरेट स्टुडिअोने घेतले आहे, तेव्हापासून बॉलीवूडच्या कलाकारांच्या मानधनात वाढ झाली आहे. ज्या अभिनेत्यांचा सक्सेस रेट चांगला आहे, त्यांना याचा चांगला फायदा झाला.

बातम्या आणखी आहेत...