आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुण धवनला सध्या तरी कर्तव्य नाही, प्रेयसी नताशा दलालसोबत केले नवीन वर्ष साजरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वरुण धवन नुकताच प्रेयसी नताशा दलालसोबत नवीन वर्ष साजरे करून मुंबईला परतला आहे. ते या वर्षी लग्न करू शकतात, असे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून येत आहे. तथापि, तिच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, दोघांनाही लग्न करण्याची कोणतीच घाई नाही. सूत्रांच्या मते, 'गेल्या वर्षी दिलेल्या मुलाखतीमध्ये वरुणने नताशासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी त्याने वेळ मागितला आहे.

 

सध्या त्याच्याकडे काही चित्रपट असून त्यावर तो लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. त्यामुळे तो यावर्षी लग्न करणार नाही, हे निश्चित आहे. त्याने आपल्या जवळच्या मित्रांनाही हेच सांगितले आहे.' सध्या वरुण आपला आगामी चित्रपट 'कलंक'वर लक्ष केंद्रित करत आहे.