Home | News | Varun Dhawan Postponed Street Dancer 3D Because Of His Wedding

डिसेंबरमध्ये वरुण धवन चढणार बोहल्यावर; यामुळे पुढे ढकलली 'स्ट्रीट डान्सर'ची रिलीज डेट

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 25, 2019, 12:48 PM IST

8 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होती फिल्म, चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यासाठी दिग्दर्शकाकडे केली विनंती

 • Varun Dhawan Postponed Street Dancer 3D Because Of His Wedding

  बॉलीवूड डेस्क - वरुण धवनचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3D'ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता पुढील वर्षी 24 जानेवारी रोजी पर्यंत ही तारीख लांबणीवर टाकली आहे. डायरेक्टर अनीस बज्मीचा 'पागलपंती' या चित्रपटासोबत क्लॅश होऊ नये यासाठी ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर दूसरीकडे वरुणने आपल्या लग्नामुळे ही तारीख पुढे ढकण्याची विनंती केल्याच्या चर्चा आहेत.


  डिसेंबरमध्ये वरुण चढणार बोहल्यावर?
  एन्टरटेनमेंट वेबसाइट स्पॉटबॉयने प्रोडक्शन हाउसशी जुडलेल्या सुत्रांनुसार लिहिले की,'चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासाठी वरुणने दिग्दर्शक रेमो डिसूजाकडे विनंती केली आहे. कारण डिसेंबर 2019 मध्ये वरुण आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांचा विवाह होणार आहे.'

  जोधपूरमध्ये होऊ शकते लग्न
  रिपोर्ट्सनुसार धवन आणि दलाल परिवार जोधपूरच्या एखाद्या पॅलेसमध्ये या लग्न करण्याचे ठरवत आहेत. इतकेच नाही तर ज्या कंपनीने प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नासाठी काम केले होते त्याच वेडिंग प्लॅनरला (मोटवाने एंटरटेनमेंट अँड वेडिंग्स) धवन आणि दलाल परिवरांनी हायर केले आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडणारे हे लग्न तीन दिवस चालणार आहे.


  वरुणने मान्य केले नताशासोबतचे नाते
  वरुण आणि नताशा दोघांनी आपल्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण वरुणने नताशासोबत असलेले आपले नाते मान्य केले आहे. करन जोहरच्या कॉफी विथ करन शोमध्ये वरुण म्हणाला होता की, 'मी तिच्यासोबत आहे. कारण तिचे स्वतः व्यक्तित्व आहे. तिला आयुष्यात जे काही मिळवायचे असेल त्यासाठी ती लढत असते. एक साथीदार म्हणून मी तिला साथ देतो.'


 • Varun Dhawan Postponed Street Dancer 3D Because Of His Wedding
 • Varun Dhawan Postponed Street Dancer 3D Because Of His Wedding

Trending