आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Varun Dhawan Praised The Trailer Of 'Judgment Hai Kya' But Didn't Wrote Kangana's Name, Rangoli Pinched Him For That

वरुण धवनने केले 'जजमेंटल है क्या'च्या ट्रेलरचे कौतुक पण लिहिले नव्हते कंगनाचे नाव, रंगोलीने टोकले तर मिळाले जशास तसे उत्तर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोट आणि राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर 2 जुलैला रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि याचे फॅन्सव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड स्टार्सदेखील कौतुक करत आहेत. याच लिस्टमध्ये वरुण धवनचेही नाव सामील आहे, ज्याने ट्विटरवर ट्रेलरचे कौतुक केले मात्र त्यावरूनही कंगनाची बहीण रंगोलीने त्याला खूप सुनावले. पण वरुणसुद्धा काही कमी नाही त्यानेही रंगोलीला सडेतोड उत्तर दिले. 

 

वरुणने केले ट्रेलरचे कौतुक... 
वरुणने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "काय मस्त ट्रेलर आहे. उत्तम लीड आणि सपोर्टिंग कास्ट आहे, उत्तम रायटिंग दिसते आहे आणि 'जजमेंटल है क्या' खूप मजेदार असल्याचे दिसते आहे." 

 

 

रंगोलीने केली त्याची चेष्टा... 
कंगनाची मॅनेजर आणि तिची बहीण रंगोली चंदेलने वरुणच्या ट्वीटवर कमेन्ट करून लिहिले, "कंगनाचेही नाव लिहायचे असते सर, तीही कुणाची मुलगी आहे, तिनेही मेहनत केली आहे." 

 

 

वरुणनेही दिले उत्तर... 
"ट्रेलरमध्ये सर्वाना पाहून मजा येत आहे सतीश सर, हुसैन, राज आणि विशेषतः कंगना, लीड कास्टचा तोच अर्थ होता मॅम. तुम्हाला शुभेच्छा..."  
 

बातम्या आणखी आहेत...