आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनचा 'मिस्टर लेले' थंड बस्त्यात, तारखांवर एकमत होत नसल्याचे दिग्दर्शकाने दिले कारण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः वरुण धवन  स्टारर आगामी 'मिस्टर लेले' चित्रपट अज्ञात काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली. तारखांबाबत एकमत नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ते म्हणाले. मात्र, संधी मिळताच चित्रपट पुन्हा सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या या चित्रपटात वरुणसह जाह्नवी कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. खेतान यांची पोस्ट वरुण धवनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.  यापूर्वीही दोघांनी धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली' हम्प्टी शर्मा की दुल्हनिया 'आणि' बद्रीनाथ की दुल्हनिया 'सारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

खेतान यांनी लिहिले - तारखांवर एकमत नाही

सोशल मीडियावर आपल्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये खेतान यांनी लिहिले आहे, 'नमस्कार मित्रांनो, मिस्टर लेलेच्या संदर्भात माझ्याकडे एक अपडेट आहे. करण, वरुण आणि मी या चित्रपटाचे शूटिंग परस्पर संमतीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक स्क्रिप्ट आहे जी आम्हा सर्वांच्या पसंतीची आहे आणि मला खात्री आहे की आम्ही लवकरच यावर परत येऊ. बर्‍याच बड्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे तारखा जुळत नव्हत्या आणि चित्रपटाचे वेळापत्रक तयार करणे खूप अवघड होते.'

वचन दिले लवकरच काम करेल


पुढे खेतान यांनी लिहिले, 'मला खात्री आहे की वरुण आणि मी लवकरच  मिस्टर लेले किंवा नवीन चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येऊ. कारण त्याच्याबरोबर चित्रपट बनवणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायक आणि समाधानकारक अनुभव असतो.' जानेवारी 2020 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि जानेवारी 2021 मध्ये तो प्रदर्शित होणार होता.

वरुणने शेअर केले होते पोस्टर 

यावर्षी 13 जानेवारी रोजी वरुणने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले होते, 'मिस्टर लेले मजा ले ले # मि. लेले येतोय नॉन स्टॉप एंटरटेन्मेंटसोबत. 1 जानेवारी 2021 रोजी थिएटरमध्ये भेटू. '

बातम्या आणखी आहेत...