आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनने वडिलांना दिले खास बर्थडे गिफ्ट, 3 तासात स्वतःच्या हाताने शिवला शर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : वरुण धवनने आपले वडील डेविड धवन यांच्या वाढदिवशी त्यांना खास गिफ्ट दिले. हे गिफ्ट खास आहे कारण त्याने ते स्वतःच्या हाताने शिवले आहे. शर्ट शिवतानाचा एक व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की,  'It always difficult to surprise him .Pa dekho tumhara beta #SuiDhaaga mein maahir ho gaya!ये शर्ट .. पापा को बर्थडे का उपहार .. बाकी बप्पा और पप्पा की वजह से .. सब बढ़िया है'

 

3 तासात पुर्ण केले शर्ट 
हा शर्ट तयार करण्यासाठी वरुणला 3 तास लागले. डेविड धवन 63 वर्षांचे झाले आहे. परंतू वडिलांना स्वतःच्या हाताने शिवलेले गिफ्ट देऊन वरुण फसला आहे. कारण डायरेक्टर शशांक खेताननेही वरुणकडे एका शर्टची मागणी केली आहे. शशांकने वरुणची पोस्ट री-ट्वीट करत लिहिले की, 'वाह मेरे मौजी… हमारा जनमदिन फरवरी में है… हो सके तो एक शर्ट हमारे लिए भी सी देना… नहीं तो कम से कम एक रूमाल ही भेंट दे देना… तुम्हारे मित्र शशांक।' वरुणच्या 'सुई-धागा' चित्रपटाचे डायरेक्टर शरत कटारिया आहेत. 


वरुणचा आगामी चित्रपट 'सुई-धागा' 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे 
- वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट 'सुई धागा- मेड इन इंडिया' 28 सप्टेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटाचे लीड अॅक्टर्स सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
- चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज दरम्यान वरुणला विचारण्यात आले की, त्याने या पात्रासाठी शिलाई काम शिकले का? तर तो बोलला की, टेलरचे काम खुप अवघड असते. 
- वरुण बोलला होता - त्याने चित्रपट करत असताना शर्ट शिवणे शिकले आहे. शर्ट तयार करताना कॉलर अटॅच करणे हे त्याला सर्वात अवघड वाटले. 
- चित्रपटात वरुणने मौजी नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का या चित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...