Home | Gossip | Varun Dhawan To Married Soon with longtime girlfriend natasha dalal

31 वर्षांचा वरुण धवन लवकरच करू शकतो लग्न, एवढ्या लवकर लग्नबंधनात अडकायचे नव्हते वरुणला, पण अचानक घ्यावा लागला निर्णय 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 12, 2019, 12:38 PM IST

लग्नासाठी दबाव टाकत आहेत गर्लफ्रेंड नताशा दलालचे पेरेंट्स, वरुणला दिली एक धमकी... 

 • Varun Dhawan To Married Soon with longtime girlfriend natasha dalal

  एंटरटेन्मेंट डेस्क : वरुण धवन लॉन्गटाइम गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत यावर्षी लग्न करू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरुणला इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते, पण त्याला हा निर्णय घ्यावा लागला. सांगितले जात आहे की नताशाआणि वरूनच प्रेम बघता तिच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की त्यांनी आता लग्न करावे. नताशाचे पेरेंट्स त्यांच्यावर जास्त दबाव टाकत आहेत.

  नताशाच्या पेरेंट्सने दिली ही धमकी...
  - सूत्रांनुसार, "वरुण आणि नताशाचे नाते खूप स्ट्रॉन्ग आहे. यामुळे नताशाचे पेरेंट्स सतत वरुणवर लग्नासाठी दबाव ताजकात आहेत. त्यांनी धमकीही दिली आहे की, जर वरून आता नताशाशी लग्न करणार नसेल तर ते दुसरा एक योग्य मुलगा शोधून नताशाचे लगान लावतील. चर्चा आहे की वरुण नताशाच्या पेरेंट्सच्या दबावात आला आहे आणि त्याने याचवर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे".

  नताशासोबतचे नाते कन्फर्म केले आहे वरुणने..
  - नोव्हेंबरमध्ये वरुण धवन अभिनेत्री कतरिना कैफसोबत करण जौहरचा चॅट शो 'कॉफी विद करन 6'मध्ये पोहोचला होता. तेव्हा त्याने आपल्या पर्सनल लाइफविषयी काही सांगितले होते. जेव्हा करनने वरुणला नताशा दलालसोबत मूवी डेटबद्दल विचारले तर तो म्हणाला, करण, वरुण आणि नताशाला कपल म्हणू शकतो. वरुणने त्यावेळी हे स्वीकार केले की तो नताशाला डेट करत आहे आणि तिच्यासोबत लग्नदेखीळ कारनार आहे. मात्र, हे सांगितले नव्हते की तो लग्न केव्हा करणार आहे.

  8 वर्षांपासून सलग हिट चित्रपट देत आहे वरुण...
  - 31 वर्षांचा वरुण डायरेक्टर डेविड धवन यांचा मुलगा आहे. त्याने 2010 मध्ये डायरेक्टर करन जौहर आणि त्याचेच धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेला चित्रपट 'स्टूडंट ऑफ दि ईयर' ने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, जो सुपरहिट झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत तो 'मैं तेरा हीरो', 'बदलापुर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'सुई धागा' अशा 10 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. खास गोष्ट ही आहे की त्याने आपल्या 8 वर्षांच्या करियरमध्ये कोणतीही फ्लॉप फिल्म दिली नाही.

Trending