आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा हॅण्डसम हंक म्हणून अभिनेता वरुण धवनकडे बघितले जाते. अल्पावधीतच वरुणने स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही एक हदयाचा ठोका चुकवणारी बातमी आहे. वरुण सध्या त्याच्या आगामी कुली नंबर 1 या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. पण याच चित्रपटातील एका स्टंट सीनचे चित्रीकरण करताना तो बाल-बाल बचावला.
झाले असे की, एक कार पहाडावरुन खाली उलटी लटकत असल्याचे आणि त्या कारमध्ये वरुण धवन असल्याचे या सीनमध्ये दाखवण्यात येणार होते. सगळे सुरळीत चालले होते. पण ऐन शॉटवेळी कारचा दरवाजा अडकला. अनेक प्रयत्न करुनही कारचा दरवाजा उघडत नव्हता. वरुण गाडीत होता आणि बाहेर सगळे काळजीत पडले होते. क्षणभर सगळ्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. सगळ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन वरुणला गाडीत सुखरुप बाहेर काढले. या सर्व परिस्थितीत वरुण अगदी संयम आणि धीराने वागल्याचे सेटवर उपस्थितांनी सांगितले.
शूटिंगपूर्वी झाली होती रिहर्सल
रिपोर्ट्सनुसार, स्टंट डायरेक्टर सीन चित्रीत करण्यापूर्वी वरुणकडून रिहर्सलदेखील करुन घेतली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि वरुणचे वडील डेविड धवन यांनी सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. पण दुर्दैवाने ही घटना घडली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.